देशोव्रती वृत्तसंकलन
नागपूर (Vidarbha Sahitya Sangh) : विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या वाड्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. येत्या, १४ आनेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात साहित्यिकांना वाड्मय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. राज्यस्तरीय विदर्भ साहित्य संघ अनुवाद पुरस्कार दीपक पारे यांच्या सैय्यद हैदर रक्षा। एका प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास’ या पुस्तकाला प्राप्त झाला आहे. राज्यस्तरीय आशा सावदेकर स्मृती साहित्य समीक्षा पुरस्कार श्रीनिवास हेमाडे यांच्या ‘तत्वभान’ या ग्रंथाला बहाल करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय कविवर्य श्रीधर शनवारे स्मृती पुरस्कार ‘घेतलय स्टेअरींग हाती’ या डॉ. पश्चरेखा धनकर यांच्या कविता सग्रहाला प्राप्त झाला, डॉ. मा. गो. देशमुख स्मृती राज्यस्तरीय संतसाहित्य/साहित्यशास्त्र लेखन पुरस्कार डॉ. अलका चिडगोपकर यांच्या मध्ययुगीन (Vidarbha Sahitya Sangh) मराठी संत कवयित्रीची काव्यधारा’ ग्रंथास तसेच स्व. गोपाळराव मुकुंदराव देशपांडे (सोनाटकर) स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत या ग्रंथास प्राप्त झाला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक पु. य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार अशोक पवार यांच्या ‘गावखोरी कादंबरीला, अण्णासाहेब खापर्डे स्मृती आत्मकथन पुरस्कार ‘विवाह नाकारतांना या विनया चाडपेकर यांच्या आत्मकथनाता, कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या आत्मप्रकाश या ग्रंथाला तर शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती कविता लेखन पुरस्कार सुनिता झाडे यांच्या ‘शब्द पसाऱ्यातील अर्थाच्या आत्महत्या या (Vidarbha Sahitya Sangh) कवितासंग्रहता प्राप्त झाला आहे. वा. कृ. चोरघडे स्मृती कथा लेखन पुरस्कार प्रमोद नामदेवराव बोरसरे यांच्या पाचोळा ला तर य. खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार अंजती विपलकट्टी यांच्या ‘माणूस असा का वागतो’ ला प्राप्त झाला आहे. वा. ना. देशपांडे स्मृती ललित लेखन पुरस्कार डॉ. लिना निकम यांच्या अक्यातो शकुन’ या ग्रंथाला देण्यात येणार आहे.
नाना जोग स्मृती नाट्यलेखन पुरस्कार अरविंद विश्वनाथ यांच्या अर्ज मोठा नामी ला देण्यात आला आहे. बा.रा. मोडक स्मृती बालसाहित्य लेखन पुरस्कार सुरेश वांदिले यांच्या ‘१६९५ स्मार्ट रोबो एआयआणि औरंगजेब आणि प्रिती वडनेरकर यांच्या सुट्टीतल्या गोष्टी या साहित्यकृतीला संयुक्तपणे देण्यात आला आहे. डॉ. वा. वि. मिराशी स्मृती वैचारिक वाडमय पुरस्कार मिलिंद कीर्ती यांच्या सहमतीची हुकुमशाही या ग्रंथाला तर के. ज. पुरोहित पुरस्कृत ‘शांताराम कथा पुरस्कार श्रीकांत बोजेवार यांच्या पती की अग्नीपरीक्षा (मौज दिवाळी अंक २०२४) या कथेला, कविवर्य ग्रेस युगवाणी तील सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचा पुरस्कार डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्या ‘झाडीपट्टी रंगभूमी परंपरा आणि परिवर्तन या लेखाला प्राप्त झाला आहे.
पुसद शाखा ठरली सर्वोत्कृष्ट
विदर्भ साहित्य संघाचा (Vidarbha Sahitya Sangh) शतकोत्तर व्दितीयवर्ष पुरस्कार वाणी आणि लेखनी या दिलीप माजगांवकर यांच्या प्रथाला प्राप्त झाला आहे असून राजन लाखे पुरस्कृत सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार यंदा विदर्भ साहित्य संघाच्या पुसद’ शाखेला प्रदान करण्यात येणार आहे. विदर्भ साहित्य संघाचा विशेष पुरस्कार डॉ. राधा मंगेशकर यांच्या ‘कहें मीरा सूर कबीरा या साहित्यकृतीला देण्यात आला आहे.
