Gadchiroli :- विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही . त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू असे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे (Vidarbha State Movement Committee) अध्यक्ष माजी आ. अॅड. वामनराव चटप यांनी केले. गडचिरोली येथील यमुना लॉन येथे विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यमुना लॉन येथे विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला
कार्यक्रमाचे उदघाटन पूर्व विदर्भ अध्यक्ष अरूण केदार यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन अॅड. निरज खांदेवाले, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, मुकेश मासुरकर, पुर्व विभाग उपाध्यक्ष सुनिल चोखारे, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष अॅड. सुरेश वानखेडे, भंडाराचे अध्यक्ष संजय केवट, अशोक पोरेड्डीवार, अमिता मडावी, छैलबिहारी अग्रवाल, उत्तर गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिह ठाकूर, कृष्णराव भोंगाळे, यवतमाळ येथील मधूसुधन कोवे, गोपाल रायपूरे, भोजराज कान्हेकर, राजकुमार शेंडे, प्रमोद राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. माजी आ. वामनराव चटप पुढे म्हणाले की , विदर्भात सोने, हिरे , मोती यांची खाण असून विदर्भातून करोडो रूपयांचा महसुल सरकारला मिळतो पण विदर्भातील जनता दारिद्रयाचे जीवन जगत आहे .यात बदल घडवून आणण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीशिवाय पर्याय नाही असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्य मार्गदर्शिका रंजनाताई मामर्डे म्हणाल्या की, स्वतंत्र विदर्भाचा लढा गेल्या १२० वर्षापासून सुरु आहे. परंतू कॉग्रेस आणि भाजप सरकारने विदर्भातील जनतेला धोका दिला असेही त्या म्हणाल्या.डॉ. पि. आर. राजपुत यांनी विदर्भातील खनीज विदर्भाच्या बाहेर गेल्याने प्रचंड प्रमाणात बेरीजगारी निर्माण झाली. विदर्भ स्वतंत्र झाल्यास सर्वच समस्या सुटतील असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.