लिपान सिटीतील फर्नांडो एअरबेसजवळ अपघात; १९६० मध्ये डिझाइन केलेल्या जुन्या मॉडेलच्या विमानांचा प्रशिक्षणासाठी वापर
फिलिपाईन्स : लष्करी विमानांच्या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत चार पायलटचा मृत्यू झाला आहे. फिलिपाईन्स एअर फोर्सची दोन विमाने हवेत एकमेकांवर आदळल्यानंतर खाली कोसळली. लिपान सिटीतील फर्नांडो एअरबेस परिसरात ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले; मात्र दोन्ही विमानांमधील एकाही पायलटला वाचवता आले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही विमानांची हवेत समोरासमोर धडक झाली. त्यानंतर काही क्षणांतच विमाने खाली कोसळली. या दुर्घटनेत चारही पायलटचा मृत्यू झाल्याचे फिलिपाईन्स एअर फोर्सने स्पष्ट केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून, या दुर्घटनेमुळे हवाई दलाकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे.
६६ वर्षे जुन्या मॉडेलच्या विमानांचा प्रशिक्षणासाठी वापर
या अपघातात सहभागी असलेली दोन्ही विमाने जुन्या मॉडेलची होती. त्यांची रचना १९६० मध्ये इटलीमध्ये करण्यात आली होती. ही विमाने हलक्या वजनाची असल्याने नैसर्गिक आपत्तींसारख्या परिस्थितीतही त्यांचा वापर केला जातो, अशी माहिती देण्यात आली आहे.
विमानांचे मॉडेल जुने असल्यामुळे फिलिपाईन्स एअर फोर्सकडून त्यांचा वापर प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी केला जात होता. मात्र, प्रशिक्षण सुरू असतानाच दोन्ही विमानांमध्ये भीषण धडक होऊन ही दुर्घटना घडली. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिक तपशील समोर आलेला नाही.
FOUR PHILIPPINE AIR FORCE PILOTS KILLED IN MID-AIR COLLISION A tragic military aviation accident has claimed the lives of four Philippine Air Force (PAF) pilots after two SF-260 trainer aircraft crashed during a training flight at Fernando Air Base in Lipa City, Batangas, south of Manila. 📍 Incident details: 📅 Date: Friday, October 23, 2026 🕒 Time: Approximately 3:51 p.m. local time ✈️ Aircraft: Two SF-260 trainer aircraft 📍 Location: Fernando Air Base, Lipa City, Batangas, Philippines 🕯️ Fatalities: Four pilots Reports confirmed that the aircraft collided in midair before crashing within the air base perimeter. No injuries on the ground were reported. 🛑 Investigation underway: The Philippine Air Force has temporarily grounded its remaining SF-260 fleet as a precaution while authorities investigate the cause of the accident. Our deepest condolences to the families, colleagues and loved ones of the four fallen aviators. #AviationAccident #MilitaryAviation #AviationSafety
— FL360aero (@fl360aero) October 24, 2026
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर पुन्हा विमान अपघाताची चर्चा
जगभरात अलीकडच्या काळात घडलेल्या विमान दुर्घटनांमुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेले विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच एका महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळले होते. त्या दुर्घटनेत २६५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते.
त्यानंतर बांगलादेशमध्येही एका शाळेवर विमान कोसळल्याची घटना घडली होती. आता फिलिपाईन्समधील दोन लष्करी विमानांच्या अपघातामुळे पुन्हा एकदा विमान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.