मानोरा (Farmers Protest) : सन २०२३ या आर्थिक वर्षी खरीप हंगामात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि ईतर पिकांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीन पिकावर यल्लो मोझॅक, कपाशीवर लाल्या या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकांची कधी नव्हे एवढी नासाडी झालेली असताना नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मंजूर करण्याची मागणी सर्वंच स्तरावरुन करण्यात आली.
परंतु राज्य शासनाने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत जाहीर केली नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे याबाबत सतत निवेदन, स्मरणपत्रे देऊन, पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिवर्तन (Farmers Protest) शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड, पंचायत समितीच्या सदस्या सौ छाया राठोड यांच्या नेतृत्वात दि.१८ डिसेंबर २०२४ पासून हिवाळी अधिवेशनात विधानभवनासमोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी वनाधिकारी सिद्धार्थ देवरे तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा, शेतकरी नेते माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन अहमदाबादकर, प्रबोधनकार पंकज पाल महाराज, प्रा जय चव्हाण उपस्थित राहणार आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.
सन २०२३ च्या नापिकीमुळे जिल्हाला दुष्काळ झाल्याने सरसकट पिक विम्याची नुकसान भरपाई देण्यात यावे,वटफळ – मेंद्रा – रुई गोस्ता गावावरून वाहणाऱ्या पूस नंदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे, वनपरिक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला तारकंपाऊडसाठी अनुदान देऊन दोन वर्षांपासुन प्रलंबित जंगली प्राण्यांच्या नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी, चिखली धरणांची व्याप्ती वाढवून धरण मोठे करण्यात यावे. तसेच सोमनाथ नगर येथील मंजूर धरणांचे कामं तात्काळ सुरू करण्यात यावे,तीर्थक्षेत्र आसोला व तिर्थक्षेत्र धोद्रा या नविन ग्रामीण मार्ग क्रमांक मिळविलेल्या रस्त्याचे बांधकाम पंतप्रधान सडक योजना निधी मंजूर करून काम तात्काळ सुरू करण्यात यावे.
मानोरा तालुक्यातील सोमठाणा व मानोरा शहरांतून वाहनाऱ्या नाल्याच्या रुंदीकरण व (Farmers Protest) खोलीकरणासाठी निधीची तरतूद करुन सोमठाणा ग्रामपंचायतीला स्मशानभूमीची जागेसाठी व कोडोली येथील स्मशानभूमीकडे पुलावरून जाण्यासाठी बांधकामासाठी नाबार्ड अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावे, ३० वर्षापासून करत असलेल्या शेतीचे पट्टे शेतकऱ्यांच्या नांवे करून देण्यात यावे, वाईगौळ येथील वहितीतील शेती अकुशल दाखवून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाडेतत्त्वावर कवडीमोल भावाने भाडेतत्त्वावर संपादन करून शेतकऱ्यांचे पिळवणूक करणाऱ्या कंपनीची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
तालुक्यातील पांदन रस्त्यांना तात्काळ निधी देऊन पांदन रस्त्यांचे काम सुरू करण्यात यावे, जंगली जनावरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शासकीय योजनेतून शेतीला तार कुंपण करून देण्यात यावे,मानोरा तालुक्यातील धरण व कालव्याच्या दुरुस्ती निधीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून धरण व कालव्याची तात्काळ दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात यावी या व इतर मागण्या साठी हे (Farmers Protest) आंदोलन विधानभवनावर भुंगा होणार असून शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राजू नाईक, रामराव चव्हाण, डॉ गणेश राठोड, रवी जाधव, साहेबराव राठोड, गजानन डोलारकर, गोपीचंद चव्हाण, बाळा चव्हाण, राम ढंगारे यांनी केले आहे.