घुग्घुस (chandrapur):- ‘नकोडा ग्रामपंचायत चे सरपंच किरण बांदूरकर व दोन अनोळखी व्यक्ती यांनी विज वितरणचे (distribution) कर्मचारी सुरज परचाके (४१) रा. जगन्नाथबाबा नगर चंद्रपूर यांना विज खांबाला बांधून शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवार दिनांक १५ जून २०२४ ला दुपारी १२.१५ वाजता नकोडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ घडली.
दोन्ही हात विद्युत खांबाला बांधून अश्लील भाषेत शिवीगाळ केली व मारण्याची धमकी
पोलीस सूत्रानुसार सूरज बंडुजी परचाके (४१)वर्ष रा. जगन्नाथबाबा नगर चंद्रपूर (Chandrapur)येथे राहत असून तो विज एमएसइडीसीएल(MIDC) घुग्घूस येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून ४ वर्षापासून कार्यरत आहे. त्यांच्याकडे उसगाव आणि नकोडा या दोन गावाचा विद्युत मेंटन्स करण्याचा प्रभार आहे. दिनांक १४ जून ला नकोडा येथील एक फेस गेल्यामुळे विद्युत पुरवठा (power supply)खंडित झाला होता. यामुळे परचाके यांनी सहकार्याला पाठवून दुरुस्ती करून दिला होता. दिनांक १५ जून ला दुपारी १२ वाजता दरम्यान सूरज परचाके हा उसगाव येथे जात असताना नकोडा ग्रामपंचायत चे सरपंच किरण बांदुरकर व दोन अनोळखी व्यक्ती रस्त्यात भेटले व आमच्या गावची डीपी नादुरुस्त आहे. आमच्या सोबत चाल व ती दुरुस्त करून दे असे म्हटले यामुळे परचाके त्याच्या सोबत गेला असता नकोडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) पुतळ्या जवळ थांबवून त्याच्याच दुपट्यानी दोन्ही हात विद्युत खांबाला बांधून अश्लील भाषेत शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली तसेच तुझे साहेब येऊ दे त्याले सुद्धा दुसर्या खांबाला बांधतो अशी धमकी देऊन काही वेळानी सोडून दिले.
यानंतर मी उपअभियंता भटारकर यांना घटनेची माहिती दिली व पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंद केली. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी नकोडा ग्रामपंचायतचे सरपंच किरण बांदुरकर व दोन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता ३४२,२९४, ५०६,३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.