पुसद (Pusad):- पुसद तालुक्यातील, जनुना येथील शेतकरी शेतामध्ये काम करीत असताना अचानक दि. 15 जूनच्या पाच वाजता दरम्यान प्रचंड वादळ वाऱ्यासह अनेक गर्जनेसह पाऊस (rain)कोसळला. यादरम्यान विजांचा कडकडाट होत होता. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर विज पडून तो जागीच ठार झाल्याची घटना घडली.
महसूल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जनुना येथील तलाठी यांनी प्रभारी तहसीलदार इंगोले पुसद यांना दिलेल्या अहवालानुसार, तालुक्यातील मौजा जनुना येथील शेतकरी संतोष नारायण वाळले वय 45 वर्ष रा. जनुना हे शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्यू(Death)झाला. त्यांच्या पश्चात सुनिता संतोष वाळले पत्नी, संतोष शिवम वाळले मुलगा, कु. अंकिता संतोष वाळले असा आप्त परिवार आहे. या संदर्भात पुसद तहसीलमार्फत नैसर्गिक आपत्ती संदर्भात शेतकऱ्यांनी दामिनी ॲपचा(damini App) वापर करावा जेणेकरून वीज कुठे पडणार आहे. याची माहिती पंधरा मिनिटे अगोदर मोबाईल ॲप वर मिळत असते. शेतकरी बांधवांनी शेतमजुरांनी पाऊस पाण्याच्या दिवसात ती मध्ये काम करीत असताना झाडाखाली उभे राहू नये, सुरक्षित स्थळ बघून त्या ठिकाणी आसरा घ्यावा, जेणेकरून नैसर्गिक आपत्ती वीज पडणे अशा पासून सुरक्षितता मिळू शकते. या आशयाचे आव्हान पुसद तहसीलदार यांच्यावतीने तालुक्यातील शेतकरी (farmer) बांधवान करिता करण्यात आले आहे.