हिंगोली(Hingoli) :- जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांच्या संदर्भात काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने हिंगोलीत भक्त सेवा मंडळातर्फे त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदविला.
पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून निषेध
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराजांबद्दल एकेरी भाषा वापरून आक्षेपार्ह विधान केल्याने संपूर्ण संप्रदायातील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे 24 फेब्रुवारी सोमवार रोजी हिंगोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा हिंगोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून निषेध व्यक्त केला. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्र महाराजांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संतोष चव्हाण गंगाधर देवकते, सखाराम चौंढेकर, शिंदे, अविनाश देशमुख, संतोष वानखेडे, गजानन तरटे, शंकर मगर, रामेश्वर कोकाटे, काशीराम लेकुळे, नारायण चौतमल, अशोक रिठे, पांडुरंग राऊत, डुकरे रेखा गव्हाणे रंजना गीते मुक्ता वानखेडे रेखा चव्हाण शोभा लुटे, राधा खंदारे, आशा पतंगे मंगल पानपट्टे, पद्मावती मिरासे या शेकडो भाविकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ चोख बंदोबस्त ठेवला होता.