बुलढाणा (Vijayraj Shinde) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभरातील जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्ती जाहीर करण्यात आले असून, त्यात बुलढाणा जिल्हा घाटावरील अध्यक्ष म्हणून माजी आमदार विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली असून, (BJP District President) बुलढाणा जिल्हा घाटावरील जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन देशमुख यांनाच कायम ठेवण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्हा घाटावरील जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेले विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) , बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून विजयी झालेले आहेत. शिवसेनेतून ते भाजपात आले असून, भारतीय जनता पार्टीच्या विविध संघटनात्मक पदावरही त्यांनी आतापर्यंत काम केले आहे. यापूर्वी (BJP District President) बुलढाणा घाटावरील जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. गणेश मांटे हे काम पाहत होते, पण आता त्यांच्या जागी विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची घोषणा महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निवडणूक निरीक्षक आ. चैनसुख संचेती यांनी केली आहे.