काजळेश्वर (washim):- जिल्ह्यातील काजळेश्वर येथे १५ जून रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह(stormy wind) बरसलेल्या पावसाने विद्युत वाहिनीचा पोल (electric pole) कोसळला. तेव्हा तारामध्ये संचारत असलेल्या विजेचा शॉक लागल्याने दोन शेळ्या जागीच दगावल्या. सुदैवाने या घटनेत मानवी जीवितहानी झाली नाही .
शनिवारी संध्याकाळी ५ वाजताचे सुमारास काजलेश्वर शिवारात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस (Rain)कोसळला. त्याचवेळी गावालगत असलेल्या विद्युत वाहिनीचा पोल कोलमडला. यावेळी विजेचा प्रवाह सुरु असल्याने ताराच्या स्पर्शाने शॉक लागून दोन शेळ्या ठार झाल्या. शेळी पालक वसंत वाडकर व समाधान खडसे यांचे या घटनेत आर्थिक नुकसान (economic loss)झाले असल्याने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेळी पालक समाधान खडसे व वसंत वाडकर यांनी केली आहे .