नागपूर (Vikas Thakre) : मागील दहा वर्षात विकासाच्या नावावर शहर भाकस झाले. पाऊस आला की पाणी घरात शिरते, हा कसला विकास आहे. लोकांचे जीवन धोक्यात आले. (Municipal Corporation) महानगरपालिका संबंधित तंत्राट अधिकारी आणि राजकीय नेते जबाबदार असल्याचा आरोप करत या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी केली. या शहरातील विकासासाठी लोकांना सोयीचा होईल, असा मास्टर प्लॅनही तयार करावा, अशी मागणी (Vikas Thakre) विकास ठाकरे यांनी केली.
नागपूर शहरातील मागील 10 वर्षात विकास झाला असता तर, लोक सुखी झाले असते. मात्र (Nagpur rain) नागपुरात पाऊस झाला की लोकांच्या घरात पाणी शिरते. लोकांचे जीवन जर धोक्यात असेल तर या विकास काय कामाचा, नियोजन शून्य विकास आहे. सिमेंट रोडमुळे स्ट्रॉम ड्रेनेज नसल्यामुळे घरात पाणी साचत आहे. या (Assembly Election) सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी (Vikas Thakre) विकास ठाकरे यांनी केली.
विधानसभेसाठी 6 जणांना तिकीट मिळाली तर, सहाही जागा निवडून येईल- विकास ठाकरे
काँग्रेसमध्ये सहा (Assembly Election) विधानसभेसाठी 73 इच्छुकाने नामांकन अर्ज आले आहे. सहा जणांना तिकीट मिळाली तर, सहाही जागा निवडून येईल. यात हायकमांड निर्णय घेईल. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला हे सुद्धा नागपूरात बैठक घेतील. यासाठी शहरात आम्ही लोकांचे सिग्नेचर घेण्याचे एक कॅम्पेन सुद्धा राबवणार आहे. या सगळ्यानंतर यावर उपाययोजना सुचवत एका अहवाल आम्ही प्रशासनाला सादर करू, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले.