प्रताप मोरे
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा () : खरीपाच्या पेरण्या सुरू होण्याअगोदर (Wooden tools) लाकडाची शेती अवजारे (Agricultural implements) तयार करूण घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी गावातील (Carpenter craftsman) सुतार कारागिराकडे असते. मात्र आता बाजारात ट्रॅक्टरवर चालणारी विविध लोखंडी अवजारे तसेच बैलांच्या साह्याने वापरता येणारी लोखंडी अवजारेही (Iron tools) बाजारात विकत मिळत आहेत. यामुळे आता दिवसे दिवस लाकडी अवजारांचा वापर पूर्णतःकालबाह्य होण्याचा मार्गावर आला आहे.
लोखंडी अवजारेही बाजारात दाखल
ग्रामीण भागातील (Village Carpenter) शेतकऱ्यांच्या कुंटूबांचा उदरनिर्वाह हा शेतीच्या भरोशावर अवलंबून आहे. सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा शेती पेरणी करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. पूर्वी पेरणीच्या दिवसात शेतकरी गावातील (Wooden tools) लाकडी शेती अवजारे तयार करणाऱ्या सुताराकडे एकमेकात चढाओढ करीत लाकडी तिफन, वखर, कोळपे, रगड, आदी लाकडी अवजारे तयार करून घेत असत. परंतु आता आधुनिकतेचे वारे शेतीतही वाहू लागल्यानंतर शेती लाकडी अवजारांचा वापर कालबाह्य होत चालला आहे. बरेचशे शेतकरी आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील कामे उरकून कापशी लागवड फुली, सोयाबीन पेरणी, करूण घेताना दिसून येत आहेत.
यावर्षी निसर्ग बदलामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील पेरण्या मृग नक्षत्रात सुरू झाल्या होत्या तर काही शिवारातील पेरण्या पावसा अभावी खोळबल्या होत्या. आता त्याही पेरण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी कामांसाठी मोठी दमछाक होत आहे. शेतकऱ्यांजवळ बैल नसल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने एक एकर शेती पेरणी करण्यासाठी तसेच औषधी फवारणीसाठी सहाशे ते सातशे रुपये खर्च येत आहेत. अलीकडच्या काही वर्षांपासून लाकडी वखर, तिफन, कोळपे, बैलगाडीसह इतर शेतीपयोगी अवजारे कालबाह्य झाली आहे. नवनव्या यंत्रांमुळे पारंपरिक पद्धतीने होणारी शेती मशागतसुद्धा मागे पडत चालली आहे. (Village Carpenter) शेती कामासाठी लागणारी सगळीच लाकडी अवजारे आता दिसत नाहीत.
लाकडी अवजारांची (Wooden tools) वाढती किंमत, मजुरी व दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. शिवाय या अवजारांकडे दुर्लक्ष झाले तर मातीच्या संर्पकामुळे त्यांना उधळी लागते, त्यामुळे तुलनेने वापरायला सोईच्या असलेल्या लोखंडी अवजारांनी शेतीमध्ये बळकट स्थान मिळवले. पेरणीसाठी लाकडी तिफनही आता नजरेआड झाली आहे. बैलजोड्यांच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर पोचल्याने बैलजोडी खरेदी करण्यापूर्वी शेतकरी अनेकदा विचार करतात. याशिवाय शेतात मजूर मिळत नसल्याने शेतीच्या मशागतीसाठी हल्ली ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दुसरीकडे (Carpenter craftsman) सुतार कारागीराकडे लाकडी शेती अवजारे तयार करण्यासाठी शेतकरी येत नसल्याने त्यांच्या कुंटूबावर उपासमारीची वेळ आली आहे.
प्रतिक्रिया
याबाबतीत सुतार कारागीर (Carpenter craftsman) यांना विचारले असता त्यांनी सागितले की पूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीपयोगी साहित्याची दुरुस्ती केल्यास मुबलक प्रमाणात अन्नधान्याची रास मिळत होती. ही पूर्वीची बलुतेदार पद्धती वेगाने बंद पडत चालली आहेत. परंतु, मागील काही वर्षांमध्ये (Wooden tools) लाकडी आवजाराची जागा लोखंडी अवजारांनी घेतल्याने सुतारगिरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, कुटुंबांचा उदरनिर्वाह भागविणे अधिक कठीण झाले आहे, असे दै. देशोन्नती सोबत बोलतांना सांगण्यात आले.