देशोन्नती वृत्तसंकलन
मेरा बु (Village CCTV camera) : गावात शांतता टिकून राहावी तसेच वाढत्या गुन्हेगारीवर वचक निर्माण व्हावा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी उपाध्यक्ष गजानन वायाळ, ठाणेदार विकास पाटील यांनी ग्रां . प. कडे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्या बाबत चर्चा केली असता लगेच सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा सचिव यांनी कोणत्याही निधीतून खर्च न करता स्वत: चे मानधन दिले. त्यामुळे संपुर्ण गावाच्या मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) बसविण्यात सुरवात केली. असा हा सरपंच महीलेकने अभिनव उपक्रम राबविला.
चिखली तालुक्यांत १५ हजार लोकसंख्या असलेल्या मेरा बु गावात विविध कार्यालय, शाळा, कॉलेज , सरकारी दवाखाना, महसूल कार्यालय आदी मोठ मोठी खाजगी दुकाने आहेत .तसेच गावात मुख्य रस्त्यावर बसस्टॉप तथा मुख्य चौका चौकात आज पर्यत कुठेही सीसीटिव्ही कॅमेरे (CCTV camera) बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे गाव कोणतही असले तरी त्या ठिकाणी काही विघ्नसंतोषी लोक असतातच असेच दारुड्यांचा त्रासही नागरिकांना होत होता. गावात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी बसस्टॉप आहे.
या बसस्टॉप वर नेहमीच बाहेर गावातील महिला पुरुषांची तसेच शाळेतील विद्यार्थिनीची मोठी गर्दी असते. मात्र काही विघ्णसंतोषी लोकांमुळे रस्त्याने येजा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असे . शिक्षकांनाही मुली बस मध्ये बसेपर्यत बसस्टॉपवर थांबावे लागत असे दारुडेही त्रास देत असल्याने त्यातून वाद होत होते यावर अनेक वेळा समज देण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु कोणावरही फरक पडत नव्हता त्यामुळे अंतिम पर्याय म्हणून कोणालाही न दुखावता राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ व अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी सीसीटीव्ही बसविण्या बाबत निर्णय घेतला आणि तो ग्रा. प. पदाधिकारी यांच्या समोर उपस्थीत केला असता.
लगेच सरपंच सौ अनिता लक्ष्मण वायाळ यांनी सांगीतले की माझे स्वत:चे मानधन घ्या आणि गावात सीसीटीव्ही (CCTV camera) बसवा असे म्हणताच ग्रा.प. उपसरपंच दिनकरराव डोंगरदिवे, सचिव प्रदिप साळवे, सदस्य सागर पडघान , तनवीर कौसर हैदर सौदागर , सौ कमल बाबुलाल जोहरे , सौ अर्चना राजेंद्र डोंगरदिवे ,अमर पडघान , पुरुषोत्तम पडघान, भरत पडघान, सौ. शकुंतला लक्ष्मण पडघान ,सौ. कल्पना विठ्ठल पडघान , , सौ. रेणुका खुशालराव पडघान, यांनीही मानधन देण्याचे कबुल केले. हा सर्व ग्रा. प. पदाधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रम पाहून गावकरी आच्छर्य चकित झाले आणि गावात दहा ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे बसवण्यात सुरवात केली.
यावेळी गावातील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ, माजी प.स.सदस्य सत्तार पटेल, ठाणेदार विकास पाटील, सरपंच सौ अनिता वायाळ, उपसरपंच दिनकरराव डोंगरदिवे, बाबूलाल जोहरे, सदस्य, सागर पडघान, अमर पडघान, तंटामुक्ती अध्यक्ष राजेन्द्र , हभप विजु पाटील, शाळा समिती सदस्य अमोल पाटील, सरपंच पती लक्ष्मण वायाळ, पत्रकार प्रताप मोरे, कैलास आंधळे, सूनिल अंभोरे, आरोग्य कर्मचारी तथा गावकरी उपस्थीत होते.
याबाबत ठाणेदार यांनी सांगितले की पोलिस स्टेशनच्या हद्दीतील २५ टक्के गावात आजपर्यत सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) बसविण्यात आले आहे आणि आज मेरा बु गावात बसविण्यात आले त्यामुळे या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गावातील गैरप्रकारांवर पोलिसांची थेट नजर राहणार आहे. या कॅमेऱ्यांजवळ बसवलेल्या स्पीकरद्वारे तेथील नागरिकांची थेट संपर्कही साधता येणार आहे. गावात चोऱ्या, घरफोड्या, विघ्नसंतोषी काही तरुणावर नजर राहणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची स्वत: च्या मोबाईल मध्ये ठेवली आहे त्यामुळे पुरावा मागण्याची गरज नाही थेट कार्यवाही करूण चोप दिल्या जाईल असे दै देशोन्नती शी सांगण्यात आले .