हिंगोली (hingoli):- वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलिस ठाणे हद्दितील वापटी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ जूनला गावठी पिस्टल तर कळमनुरी शहरातून लायटर पिस्टल जप्त करून भारतीय हत्यार (Indian weapons) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध गावठी पिस्टल व स्टीलची मॅग्झिन जप्त
२८ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कुरूंदा पोलिस ठाणे (Police Station) हद्दित पेट्रोलिंग करीत असताना वापटी एका जनाजवळ गावठी पिस्टल (Firearms) असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहिती नुसार वापटी येथे जाऊन छापा मारला. प्रदिप शिवाजी शिंदे याच्या जवळील २५ हजार रुपयाचे १ अवैध गावठी पिस्टल व स्टीलची मॅग्झिन जप्त करण्यात आली. त्याच प्रमाणे कळमनुरी शहरातील नाईकवाडी भागातही पिस्टल असल्याची माहिती मिळताच पथकाने छापा मारला असता, अदनान उल हक हमान रा.नायकवाडी मोहल्ला कळमनुरी हा गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सारखे हुबेहुब दिसणारे लायटर पिस्टल ताब्यात घेऊन फिरत असताना मिळूना आला. त्याच्याकडून २ हजार रुपयाचे लायटर पिस्टल जप्त करून कुरूंदा व कळमनुरी पोलिसात प्रदिप शिवाजी शिंदे रा वापटी, अदनान उल हक हमान रा.नायकवाडी मोहल्ला कळमनुरी या दोघावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा(crime) दाखल करण्यात आला. ही कारवाई(action) जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.