कारंजा/वाशिम (PM Gramsadak Yojana) : काजळेश्वर ते वाई रस्त्याच्या डांबरीकरण कामात (Road construction) झालेल्या गैरव्यवहाराची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करावी या व अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील लोहारा येथील एका ग्रामस्थाने २५ जूनपासून स्थानिक तहसील कार्यालयासमोर (Hunger strike) बेमुदत उपोषण आंदोलनाला तर त्यांना सहकार्य म्हणून दोघांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत (PM Gramsadak Yojana) काजळेश्वर ते वाई डांबरीकरण रस्ता व लोहारा येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यात आले असून, या रस्त्याच्या लगत (Hunger strike) उपोषणकर्त्यांची जमीन आहे. त्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, तूर व मिरची पीक घेण्याचे नियोजन केले आहे. साचलेले पाणी या पिकांसाठी संवेदनशील आहे. तर, तयार केलेल्या नवीन रस्त्याच्या (रा.मा. २७४) लगत असलेल्या नालीत मुरुम व दगड पडून आहे.
परिणामी, भविष्यात शेतात पाणी साचून ही पिके खराब होवून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. (Road construction) रस्ता बांधकाम करणाऱ्या मेसर्स प्रभ इंजिनिअर्स या कंत्राटदाराने व एम.बी. रेकॉर्डीग करणाऱ्या कार्यकारी अभियंत्याने चुकीच्या पध्दतीने अंदाजपत्रक बनवून प्रशासन व शेतकरी दोघांचे नुकसान केले आहे. त्यामुळे संबंधित मंजूर बांधकाम केलेल्या रस्त्याचे अंदाजपत्रक एम.बी. रेकॉर्डीग बूक झेरॉक्स व पुर्णत्वाचा दाखला (सी.सी. प्रमाणपत्र) झेरॉक्स प्रत तक्रारदारास तत्काळ उपलब्ध करून द्यावी. शेताच्या लगतच्या नालीतील पडून असलेला मुरुम व दगड भराव काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा.
येत्या खरीप हंगामामध्ये माझे सोयाबीन, तुर व मिरची पिकाचे नुकसान झाल्यास (Agriculture Department) कृषी विभाग यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून नुकसान भरपाई संबंधित कार्यकारी अभियंता व कंत्राटदार या दोघांकडून वसुल करण्यात यावी,अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे. रस्त्याच्या दोन्ही नालीचा उतार गावातील शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थित करून पाण्याचा प्रवाह उताराच्या दिशेने पाऊस पडण्याअगोदर सुरळीत करावा,अशी मागणीही (Hunger strike) बेमुदत उपोषणकर्ते निलेश प्रल्हाद राठोड व (Hunger strike) सहसाखळी उपोषणकर्ते सुनिता नामदेव चव्हाण व किशोर शंकर राठोड यांनी केली आहे.