Buldhana:- चिखली व परीसरातील दारू, गांजा, सट्टा या अवैध (illegal)व्यवसाया विरोधात पोलीस विभागाने कठोर कार्यवाहीचे सत्र सूरू केले आहे मात्र हे अवैध व्यवसायाचा कायम स्वरूपी बिमोड होण्याकरीता गावकर्यांचा सहकार्याची गरज आहे त्यानी निर्भय होत सहकार्य करावे असे आवाहन चिखली येथे गावकर्यांशी संवाद साधताना कूरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेन्द्र वाघ(police station)यानी केले.
ग्रामसभेत अवैध व्यवसाया विरोधात ठराव करण्यात आला
चिखली येथील ग्रामसभेत(gram sabha) अवैध व्यवसाया विरोधात ठराव करण्यात आला आहे व त्यांचा घरावर मोर्चा काढत त्याना अवैध व्यवसाय बंद करण्याबाबद तंबी सूद्धा देण्यात आली आहे मात्र तरी काही व्यावसायिकांचे मूजोरीने अवैध व्यवसाय सूरूच असल्याचे निदर्शनात येताच शनिवार रोजी पोलीसानी मेघराज बिसन बालोरे रा.चिखली वय ४० याचे खैरीटोला येथे सूरू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकत येथून २५ लिटर हातभट्टीची मोहफूलाची दारू किमंत ५ हजार व निखील रामदास राऊत वय २७ रा. चिखली याचा घरावर धाड टाकत तिथून देशी विदेशी दारूचा एकूण ५ हजार ४०० रूपयाचा मूद्देमाल जप्त केला यावेळी ठाणेदार(Thanedar) महेन्द्र वाघ यानी चिखली येथे उपस्थीत गावकर्यांशी प्रत्येक्ष संवाद साधला व परीसरात कोणतीही अवैध हालचाल निदर्शनात येताच गावकर्यानी पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
शनिवार रोजी धाड़ टाकत करण्यात आलेल्या कार्यवाहीत दोन्ही आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी (Prohibition of alcohol) कायदा ६५(ई) अन्वये गून्हा दाखल करीत अटक(arrested) करण्यात आली आहे सदर कार्यवाही ठाणेदार महेन्द्र वाघ यांचा नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे, पोलीस हवालदार शेखलाल मडावी, संदेश भैसारे,प्रदिप भसारकर पोलीस शिपाई मेश्राम महिला पोलीस शिपाई किरण मडावी,लोहम्बरे यांचा चमूने केली.