तेल्हारा (Akola):- अकरावीत शिकत असलेल्या अल्पवयीन सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा घरासमोरील भावंडांपैकी एकाने पाठलाग करत विनयभंग (disobedience) व शिवीगाळ तर दुसर्या भावाने पिढीतला जीवाने मारण्याची धमकी(Threat) दिल्याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी घटनेच्या दिवशी शुक्रवार दि.१४ रोजी तक्रारीवरून(complaints) पोस्कोसोह भांदविच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल (crime filed)करून एकास अटक केली आहे.
हात पकडून विनयभंग करून शिवीगाळ
तेल्हारा तालुक्यातील थार येथील सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा १४ जून रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान घराचे बाजूला ती पाणी भरण्यासाठी गेली असता आरोपी ऋषिकेश संतोष हेरोडे राहणार थार तालुका तेल्हारा यांने वाईट उद्देशाने उजवा हात पकडून विनयभंग करून शिवीगाळ केली तर थोरला भाऊ विजय संतोष हेरोडे राहणार थार तालुका तेल्हारा याने पीडितेस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी (Threat)दिली. फिर्यादी पीडीतेच्या तक्रारीवरून दिनांक १४ जून रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेपूर्वी नमूद आरोपीविरुद्ध पोलिसांनी भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० चे कलम ३५४, ३५४ डी, ५०४, ५०६ ,३४ तसेच बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे .आरोपी ऋषिकेश संतोष हेरोडे यास पोलिसांनी अटक केली असून पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे पुढील तपास करीत आहेत.