विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल
मुंबई (Vijay Wadettiwar) : मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात दुर्गम कांदाटी खोऱ्यातील सहाशे चाळीस एकर जमीन (Violation of Forest Act) अत्यंत अल्पदरात खरेदी केली आहे. हा खरेदी करणारा अधिकारी गुजरातच्या जीएसटीत कमिश्नर आहे. त्याने जागा खरेदी करत असताना सर्व नियम धाब्यावर बसवले आहे. या अधिकाऱ्यावर काय करावाई करणार असा सवाल (Legislative Assembly) विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विधासनभेत वनमंत्र्यांना केला.
गुजरातच्या जीएसटी कश्मिनरची साताऱ्यात सहाशे एकर जमीन
वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, कांदाटी खोऱ्यातील जमीन खरेदी करताना कमाल मर्यादा पायदळी तुडविली. वन जमिनीतून रस्ते खोदून काढले, खोदकाम करताना महसूल विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. महसूलच्या जागेतून रस्ते काढले. करोडो रुपयांचा महसूल बुडाला. ज्या ठिकाणी वन कायद्याचे उल्लंघन झाले. अवैध्य बांधकाम सुरू केले, जंगलतोड केली, पर्यावरणाचा धोका निर्माण झाला. विशेष म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा हा परिसर आहे. तरी देखील राजरोसपणे हे सगळ सुरू आहे. सरकार त्यावर का कारवाई करत नाही, असा सवाल (Vijay Wadettiwar) वडेट्टीवार यांनी विधानसभेत वनमंत्र्यांना केला.