परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा निकाल; मानवत येथील प्रकरण
परभणी (Girl molesting Case) : तुझ्या मापाचे कपडे आले आहेत. मला तुझे माप घ्यायचे आहे, असे म्हणत पिडितेला दुकानात नेऊन तीचा विनयभंग (Girl molesting Case) करण्यात आल्याची घटना २९ मे २०२३ रोजी मानवत पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. या प्रकरणात परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एम.नंदेश्वर यांनी निकाल दिला असून आरोपीला तीन वर्ष कैद, ५ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, पिडित मुलगी व तिचा भाऊ दोघेजण गावातील किराणा दुकानावरून सामान घेऊन घरी जात असतांना आरोपी शिवाजी कारभारी शिंदे यांने पिडितेला तुझ्या मापाचे कपडे आले आहेत. मला तुझे माप घ्यायचे आहे. असे म्हणत पिडितेला दुकानात नेले व तिचा विनयभंग केला. घडलेला प्रकार पिडितेने आईला सांगीतला. त्यानंतर मानवत पोलीस ठाण्यात आरोपीवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस उपअधिक्षक पी.बी.गोफने यांनी तपास केला.
सुनिल ओव्हळ यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्पेâ ५ साक्षीदार तपासण्यात आले. (Girl molesting Case) न्यायालयाने आरोपी शिवाजी कारभारी शिंदे याला शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड.ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड.अभिलाषा पाचपोर यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि.सुरेश चव्हाण, पोलीस अंमलदार सय्यद रहीम, प्रमोद सुर्यवंशी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.