परभणी/गंगाखेड(Parbhani):- कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार (Torture ) व खून(Murder) या घटनेच्या निषेधार्थ गंगाखेड शहरातील डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारत मुक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. आरोपींना पाठीशी घालणारे ममता बॅनर्जी सरकार (Mamata Banerjee Govt) बरखास्त करावे अशी मागणी यावेळी डॉ. सुभाष कदम यांनी केली आहे.
गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना जामीन न देता विशेष न्यायालयात खटला चालवून तात्काळ निकाल द्यावा
पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता(Kolkata)येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी.चे पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ गंगाखेड शहरातील डॉक्टरांनी दि. १७ ऑगस्ट शनिवार रोजी अत्यावश्यक सेवा (Emergency services) वगळता अन्य इतर सेवा बंद ठेवण्याचे आवाहन करत लाक्षणिक बंद पुकारत मुक मोर्चा काढून या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना जामीन न देता विशेष न्यायालयात खटला चालवून तात्काळ निकाल द्यावा, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राजकीय व शासकीय व्यक्तींची गय न करता त्यांना सुद्धा सह आरोपी करून त्यांच्यावर ही खटला चालवावा, अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी सुरक्षा यंत्रणा उभारावी अशा मागणीचे निवेदन तहसील प्रशासनाकडे सादर केले आहे. तर आरोपींना पाठीशी घालणारे ममता बॅनर्जी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी यावेळी डॉ. सुभाष कदम यांनी केली आहे.
मुक मोर्चात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची उपस्थिती
या मुक मोर्चात इंडियन मेडिकल असोसिएशनचे गंगाखेड अध्यक्ष डॉ हेमंत मुंढे यांच्यासह डॉ. श्रीहरी टाले, डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. दिपेंद्र आळनुरे, डॉ. किशन गारोळे, डॉ. सुनील तोष्णीवाल, डॉ. स्नेहा तोष्णीवाल, डॉ. पवार, डॉ. धनंजय लटपटे, डॉ. सुभाष कदम, डॉ. नीळकंठ लटपटे, डॉ. मानकर, डॉ. रितेश वट्टमवार, डॉ. धुमाळ, डॉ. बागेश्री भरड, डॉ. शोभा कदम, डॉ. अर्चना निरस, डॉ. राणी इदाते, डॉ. केशव मुंडे, डॉ. इदाते, डॉ. दिलीप गोरवे, डॉ. रानगिरे, डॉ. कुगने, डॉ. संजय पवार, डॉ. दिलीप फड, डॉ. संजय भरड, डॉ. योगेश मल्लूरवार, डॉ. फेरोज शेख, डॉ. अनिल चव्हाण, डॉ. प्रीती घुले, डॉ. प्रतिभा भालेराव, डॉ.दिपाली अळनुरे, डॉ. प्रज्ञा मुंडे, डॉ. होळंबे, डॉ. चांगभले, डॉ. फड, डॉ. एन.डी. लटपटे आदींची उपस्थिती होती.