मंगळरु बु.परिसरात भितीचे वातावरण वन विभागाने लक्ष देण्याची मागणी
परभणी (Parbhani) मानवत, पाथरी तालुक्यातील काही गावांमध्ये मागील एक ते दोन महिन्यांपासून हिंस्र प्राण्याच्या वावरामुळे भितीचे वातावरण आहे. त्या प्राण्यांच्या हल्यात नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या भागातील शेतकर्यांनी वन विभागाकडे (Forest Department) बंदोबस्त करण्याची मागणी केली असतांना वनविभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. या संदर्भात वन अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही म्हणजे वन विभागाला शेतकऱ्यांची काळजी नसल्याचं दिसून येते
वन विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष
मानवत तालुक्यातील मंगरुळ बु. शिवारात शनिवार ७ सप्टेंबरच्या सात्री एका हिंस्र प्राण्याने गायीच्या वासरावर हल्ला करुन फडशा पाडल्याची घटना घडली आहे. मागील काही दिवसात हिंस्त्र प्राण्याने हल्ला करण्यांच्या घटना वाढल्याने परिसरात भितीचे वातावर निर्माण झाले आहे. मंगरुळ बु.गावात रात्री गावातील शेतकरी भागवत देशमाने यांच्या आखाड्यावार बांधलेल्या दोन वर्षाच्या गायीच्या वासरावर हल्ला केल्याने नुकसान झाले आहे. परिसरात काही दिवसांपूर्वी काळविट, शेळी, वासरु सदर प्राण्याने फस्त केल्याची घटना घडली होती. तर दोन दिवसांपूर्वी याच गावात मंचक मोरे यांच्या शेतात हा प्राणी दिसला होता. त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. याकडे वन विभागाने लक्ष देवून प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.