पार्डी मोड येथील विपश्यना केंद्र भूमिपूजन सोहळ्याला धम्म सेवकांची तोबा गर्दी
आखाडा बाळापुर/हिंगोली (Vipassana Kendra Bhumi Pujan) : तथागत गौतम बुद्धांनी समतेच्या तत्त्वावर बुद्ध धम्माची स्थापना केली. मानवी जातीला उपकारक ठरणार्या तत्वांची शिकवण बुद्ध धम्माने दिली सध्याच्या काळात मानवी मन गढूळ झाले आहे; परंतु विपश्यनाच मानवी मन स्थिर ठेवेल आणि जगात शांतता प्रस्थापित करेल असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महाथेरो यांनी व्यक्त केले.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पार्डी मोड येथे भदंत महास्थवीर चंद्रमणी विपश्यना केंद्राच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. पूज्य भदंत खेमोधम्माजी , पूज्य भदंत उपगुप्तजी महाथेरो , पूज्य भदंत डॉ. सत्यपालजी व भिख्कू संघाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आ. संतोष बांगर यांच्या उपस्थितीत व पुढाकारातून या विपश्यना केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मंचावर आ.संतोष बांगर, दिवाकर माने, बाबुराव कदम, किरण घोंगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. संध्या रंगारी , रमेश कदम यांनी केले.
यावेळी भिख्कू संघाला चिवरदान करण्यात आले. भिख्कू संघाने धम्मदेशना दिली. यावेळी विपश्यना केंद्राचे हे ऐतिहासिक कार्य अनेक काळ टिकणारे आहे. ३२ कोटी रुपये खर्चून होणारे विपश्यना केंद्र व रिसर्च सेंटर हिंगोली जिल्ह्यातील अनेक अभ्यासकांसाठी व साधकांसाठी महत्त्वाचे ठरेल असेही भदंत उपगुप्त यांनी सांगितले. प्रारंभी माळेगाव फाटा येथून पार्डी मोड पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.