लोकशाहीच्या महोत्सवासाठी मतदान करा : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर
– मतदान करून नवदाम्पत्यांना द्या बळकट लोकशाहीचे ‘गिफ्ट’
– मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज
– गृहभेटीतून तब्बल 1207 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
– मतदारसंघात गृहभेटीदरम्यान झाले 92 टक्के मतदान
– ज्येष्ठ व दिव्यांगांनी सक्षम ॲपमध्ये नावनोंदणी करून ने-आण सुविधेचा लाभ घ्यावा
जिमाका (Hingoli) : भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा (Hingoli LokSabha) मतदारसंघासाठी उद्या शुक्रवार, दि. 26 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी (Election Commission) निवडणूक आयोगासह जिल्हा निवडणूक विभागाने सर्व तयारी केली आहे. तसेच या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे होत असल्याने या सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यापूर्वी वधू-वरांसह सर्व नातेवाईक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावूनच नवदाम्पत्याला बळकट लोकशाहीचे गिफ्ट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर (Jitendra Papalkar) यांनी केले आहे.
लोकसभा मतदारसंघात (LokSabha Election) मतदानाची टक्केवारी वाढावी, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभागाने दोन गृहभेटी घेत निवडणूक विभाग मतदारांपर्यंत पोहोचला आहे. लोकसभा मतदारसंघात एकही मतदार आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी डोंगर-दऱ्या, माळरान, आणि धरणांच्या काठावर राहणाऱ्या झोपडीपर्यंत पोहोचत तब्बल 1207 मतदारांचे मतदान करून घेतले असून, ते 92 टक्के झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पापळकर (Jitendra Papalkar) यांनी सांगितले.
हिंगोली लोकसभा (Hingoli LokSabha) मतदार संघातील मतदानाचा अर्जाचा नमुना 12 डी हे 39 हजार 709 मतदारांना वितरीत केले होते. त्यापैकी 1391 ज्येष्ठ, दिव्यांग आणि सैनिक मतदारांकडून प्राप्त झाले आहेत. तर नमुना 12 डीचे 1312 अर्जांना स्वीकृती देण्यात आली असून, आतापर्यंत 1207 मतदारांकडून मतदान करण्यात आले आहे. हे 1207 मतदान आता कडक सुरक्षा व्यवस्थेत पेटीबंद करण्यात आले आहे. हिंगोली लोकसभा (Hingoli LokSabha) मतदार संघात सद्यस्थितीत एकही कोविड रुग्ण नाही, ही समाधानाची बाब असल्याचे (Election Commission) जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पापळकर यांनी सांगितले. (Election Commission) निवडणूक विभागाने निवडणूक पथकांनाच मतदारांच्या गृहभेटी घेऊन मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या सोहळ्यात आपल्या मतांचे दान केले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर (Jitendra Papalkar) यांनी सांगितले.
आतापर्यंत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या 2574 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान सुविधा केंद्रावर मतदानाचा हक्क बजावत या लोकशाहीच्या लोकोत्सवात आपला सहभाग नोंदवला असून, 1348 सैनिकांना संगणकीय प्रणालीद्वारे (ईटीपीबीएमएस) पाठविण्यात आले होते, यापैकी 178 सैनिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, दि. 4 जून 2024 रोजी सकाळी मतमोजणी सुरु होईपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे त्यांनी (Jitendra Papalkar) सांगितले.
हिंगोली लोकसभा (Hingoli LokSabha) मतदार संघात 82-उमरखेड विधानसभा मतदार संघात 342 मतदान केंद्र असून त्यापैकी धारकना-36, उमरखेड-218,219 आणि 220, धानकी-291 आणि 292 हे संवेदनशील मतदान केंद्र आहेत. 83-किनवट विधानसभा मतदार संघात 330 मतदान केंद्र असून त्यापैकी पापळवाडी-58, धुंद्रा-68, मांडवी-127 आणि 128, चिखली-243 व 244 हे संवेदनशील मतदान केंद्र आहेत. 84-हदगाव विधानसभा मतदार संघात 319 मतदान केंद्र असून त्यापैकी चोरंबा खु.-246 हे संवेदनशील मतदान केंद्र आहे. 92-वसमत विधानसभा मतदारसंघात 327 मतदान केंद्र असून त्यापैकी किन्होळा-185 हे संवेदनशील मतदान केंद्र आहे. तर 93- कळमनुरी विधानसभा मतदार संघात 345 व 94-हिंगोली विधानसभा (Hingoli LokSabha) मतदार संघात 343 मतदार केंद्र असून या दोन्ही विधानसभा मतदार संघात एकही संवेदनशील केंद्र नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग, राज्य राखीव पोलीस बल आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याशिवाय (Election Commission) जिल्हा निवडणूक विभागाने उद्या शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना सक्षम ॲपमध्ये नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर (Jitendra Papalkar) यांनी सांगितले.