स्वीपच्या मतदार जनजागृती उपक्रमाला यशाची किनार : सौरभ कटियार
अमरावती (Amravati) : काल झालेल्या (LokSabha Election) लोकसभेच्या निवडणुकीत अमरावतीकरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत अमरावतीच्या लोकसभा (Amravati LokSabha) इतिहासातील मागील पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत झालेल्या पाच निवडणुकीतील आपला स्वतःचा विक्रम मोडीत या (LokSabha Election) लोकसभा निवडणुकीत 64.02% मतदान करून मतदानाचा उच्चांक गाठला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार (Collector Saurabh Katiyar) यांच्या मार्गदर्शनात यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि अमरावती जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे. यासाठी डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हाभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये चुनाव की पाठशाला, गाव फेरी, सावली बैठका, निवडणुकीचे पंचसुत्री, अमरावतीचा वोटोबा, द पिंक फोर्स, कॉलेज कॅम्पस अँबेसिडर, मतदानावर बोलू काही फेसबुक लाईव्ह शो, साडे अकरा हजार विद्यार्थ्यां आणि अधिकारी कर्मचारी व नागरिकांची मानवी साखळी, पंधरा हजार नागरिक, विविध सेवाभावी संस्था आणि अधिकारी व कर्मचारी यांची मतदान जनजागृती तिरंगा महारॅली, रसपान भी और मतदान भी, मतदारांची पुष्पगुच्छ देऊन ओवाळणी यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणात (Voter awareness campaign) जनजागृती झाली. सतत महिनाभर गाव, शहर, गल्ली मतदान जनजागृतीने पिंजून काढण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने प्रत्येक तालुक्याला स्विप नोडलचे एक एक पथक तयार करण्यात आले होते. ज्यांनी आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी अथक परिश्रम घेतले. द पिंक फोर्स च्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
वारंवार जिल्हाधिकारी सौरभ कटियार (Collector Saurabh Katiyar) , पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मनपा आयुक्त देविदास पवार, पद्मश्री शंकर बाबा पापळकर, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके, कोण बनेगा करोडपती विजेती बबीता ताडे, रोटरी क्लबचे राजेश मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून मतदारांचा उत्साह जागृत केला. यामुळे अमरावती करांमध्ये एक नवीन उत्साह दिसून येत होता. प्रत्येक जण मी मतदान करणार याची शपथ घेऊन मतदान करण्यासाठी वचनबद्ध होत होते. यासाठी शाळा महाविद्यालय विद्यापीठ इत्यादी ठिकाणी मतदानाची शपथ घेण्यात आली. याला शेवटी गोड फळे मिळाले. अमरावती जिल्ह्याने पंचवीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदानाचा उच्चांक गाठला याचा अतिशय आनंद होत आहे. या सर्व कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हा स्वीप टीमचे ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, हेमंत कुमार यावले,श्रीकांत मेश्राम, मंगेश मानकर, नितीन माहुरे, गजानन कोरडे, नारे, गजानन इत्यादींनी नियोजनामध्ये अहोरात्र परिश्रम घेतले.
“जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सतत महिनाभर मतदारांमध्ये (Voter awareness campaign) जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले. यासाठी स्वयंसेवी संस्था, विविध क्लब, नागरिक अधिकारी आणि कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात साथ मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सतत मार्गदर्शन आणि स्विप टीमचे परिश्रम यामुळेच मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही विविध उपक्रम राबवत जनजागृती करू शकलो.”
– डॉ.कैलाश घोडके, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी