नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे- जिल्हाधिकारी
हिंगोली (Voter Awareness Rally) : जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येत्या बुधवारी, दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. (Voter Awareness Rally) मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा. जिल्हा निवडणूक विभाग 75% वर मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करत असून, ‘आम्ही मतदान करणारच; तुम्हीही मतदान करा’ असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे केले. ‘स्वीप’च्या माध्यमातून आयोजित मतदार जनजागृती रँलीस जिल्हाधिकारी गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी शिक्षणाधिकारी (मा.) तथा ‘स्वीप’ समितीचे नोडल प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय नांदे उपस्थित होते. नागरिकांनी येत्या बुधवारी (दि.20) जिल्ह्यातील 92- वसमत, 93- कळमनुरी आणि 94- हिंगोली विधानसभा मतदारसंघात नागरिकांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. या दिवशी जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये बसण्याची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, सावलीसाठी शेड, शामियाना, मंडप, बसण्यासाठी खुर्ची, दिव्यांगासाठी व्हीलचेअर, रॅम्प यासह सुविधा उपलब्घ करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी केले.
ही (Voter Awareness Rally) दुचारी रँली जिल्हाधिकारी कार्यालय, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेशन रोड, एलआयसी ऑफिस रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जुनी जिल्हा परिषद, जिल्हा परिषद रोड, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मार्गे ‘आम्ही मतदान करणारच’ या आशयाचे पोस्टर घेऊन दुचाकीवरून या रँलीद्वारे जनजागृती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांना मतदानाची शपथ देण्यात आली व रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात समारोप करण्यात आला.