स्वीपचा मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनोखा उपक्रम : सौरभ कटियार
अमरावती (Amravati) : येत्या शुक्रवारी (LokSabha Election) लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात स्वीपच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी 26 एप्रिलला पहिल्या पंधरा मिनिटात मतदानाला येणाऱ्या गावा गावातील मतदारांना पुष्पगुच्छ देऊन आणि ओवाळणी करून स्वागत करण्यात येणार असल्याचे स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील (Amravati elections) मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आजपर्यंत स्वीपच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम जसे मानवी साखळी, तिरंगा महा रॅली, सावली बैठका, गाव फेरी, द पिंक फोर्स ग्रुप यासारखे उपक्रम राबवून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे. तर शहरी भागातील मतदारांसाठी रसपान भी और मतदान भी, गल्लीगल्लीत रॅली, इत्यादी उपक्रम स्वीप च्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.
गावपातळीवर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ए एन एम, शिक्षिका बचत गटांच्या महिला यांचा द पिंक फोर्स नावाचा ग्रुप स्थापन करण्यात आला असून हा ग्रुप प्रत्येक दिवशी घरोघरी भेटी देऊन मतदारांना जागृत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहे. गावागावातील मतदारांकडून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ही मिळत आहे. गावातील प्रत्येक नागरिकात लोकशाहीचे मूल्य रुजविण्यासाठी आणि प्रत्येकांच्या मतांचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा ग्रुप अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असून याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी (Amravati elections) मतदानाच्या दिवशी पहिल्या पंधरा मिनिटात जे (Amravati elections) मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येथील त्या मतदारांची ओवाळणी करून आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार असल्याचे माहिती स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ.कैलाश घोडके यांनी दिली.यावेळी बोलताना ते म्हणाले की, मतदारांना आकर्षित करून अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवणे हे जिल्हा स्वीप टीमचे मुख्य उद्दिष्ट आहे. या माध्यमातून (Amravati District) अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहेत. यासाठी स्वीपच्या जिल्हा नोडल कक्षाचे श्री ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, प्रा. राजकुमार दासरवाड, श्रीकांत मेश्राम, गजानन कोरडे, हेमंतकुमार यावले हे सर्व प्रयत्न करत आहेत.
“अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असून मतदारांची ओवाळणी आणि पुष्प देऊन स्वागत करणे हा सुद्धा चांगला उपक्रम असून यामुळे मतदार मतदान केंद्राकडे आकर्षित होतील असं मला विश्वास आहे ”
– सौरभ कटियार, जिल्हाधिकारी अमरावती