देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर/भंडारा (Health camp) : तुमसर-मोहाडी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारा कडुन आरोग्य शिबीर (Health camp) आयोजित करण्यात आले होते. पऱतु सदर आरोग्य शिबीर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पचनी पडत नसल्याने सदर आरोग्य शिबीर राजकीय हेतूने बंद पाडण्यासाठी डाव रचणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांला तालुक्यातील अंध, अपंग, आणि वृद्ध मतदार धडा शिकवणार असल्याची चर्चा रंगत आहेत.
आमदार पदासाठी उभा असलेल्या त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारां विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. या (Health camp) शिबिराचा लाभ घेण्याची प्रतीक्षा करणाऱ्या अनेकांना अचानक या निर्णयामुळे मोठा धक्का बसला. या मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याचा निर्धार केला आहे.
या (Health camp) आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, औषधे, आणि उपचार मिळण्याची संधी महायुतीच्या उमेदवाराने केली होती. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, अपंग, आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांसाठी हे शिबीर म्हणजे एक मोठा आधार होता. परंतु, या शिबीरा विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असल्याने आरोग्य शिबीर बंद पडले. परिणामी शिबीर रद्द झाल्यानंतर अनेक अपंग आणि वृद्ध नागरिकांनी या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केली आहे.