वैनगंगा तैराकी मित्र मंडळाच्या सदस्यांनी वाचविले दोघांचे प्राण
भंडारा (Wainganga River) : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय भंडारा जवळील वैनगंगा नदीवर थरार पहावयास मिळाला. कर्तव्यावर येत असलेल्या कर्मचार्यांची मोटारसायकल अनियंत्रित होऊन कारधा पुलावरून वैनगंगेत कोसळले. नशीब बलवत्तर म्हणून दोघेही वाचले. आरडा-ओरड करताच (Wainganga River) वैनगंगा तैराकी मित्र मंडळाच्या सदस्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना सुखरूप वाचविले.
लाखनी जवळील गडेगाव येथील सुखराम फसाटे व जितेंद्र सपाटे हे मोटारसायकलने भंडारा दुग्ध संघात कर्तव्यावर कारधा पुलावरून जात असताना अचानक मोटारसायकल अनियंत्रित होऊन दुचाकीसह दोघेही वैनगंगेत कोसळले. त्यावेळी (Wainganga River) पुलावरून जाणार्या लोकांनी आरडाओरड केली असता नदीवर आंघोळीला गेलेले अनिल लांबट, प्रशांत कारेमोरे, जितू हलमारे यांनी धाव घेत पुलावरून नदीत उडी घेतली.
जवळच्या हनुमान मंदिरात ठेवलेले दोरखंड व लाईफ जॅकेट घेऊन रवी गिल्लोरकर, अमोल शहारे, ताराचंद कटारे यांनी पोहचून त्यांना लाईफ जॅकेट व दोरखंडाच्या मदतीने दोघांनाही वाचविले. अगोदरसुध्दा (Wainganga River) वैनगंगा तैराकी मित्र मंडळाच्या सदस्यांनी नदीमध्ये बुडणार्या अनेकांचे प्राण वाचविले आहेत.