वाकोडी/हिंगोली (Wakodi Crime) : कळमनुरी तालुक्यातील (Kalamanuri Police) बाभळी फाटा येथे ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन (youth suicide) आत्महत्या केल्याची घटना दि. १ जुलै रोजी रात्री उघडकीस आली. माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील बाभळी फाटा येथील माधव उर्फ संभाजी खिल्लारे वय ३० वर्षे हा युवक शिऊर साखर कारखाण्यालगत असलेल्या एका शेतामध्ये सालगडी म्हणून वास्तव्यास होता. दि. १ जुलै रोजी रात्री ७ च्या सुमारास बाभळी येथे आजोबाला भेटण्यासाठी म्हणुन माधव उर्फ संभाजी खिल्लारे हे गेले. परंतु बराच वेळ वेळ निघून गेल्यानंतर माधव हे परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता, बाभळी येथील त्यांच्या घरी माधव यांचा (Wakodi Crime) दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
यानंतर याबाबतची माहिती कळमनुरी पोलिसांना (Kalamanuri Police) दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन जाधव, पोलीस उपनिरीक्षक गजानन कांगणे,स.पो. उपनी. गणेश पोले जमादार संजय राठोड,जगन पवार, इंगोले यांनी घटनास्थळी धाव (youth suicide) घेत घटनेचा पंचनामा केला. माधव खिल्लारे यांचा मृतदेह कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. दरम्यान या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.