वाशिम(Washim):- गत एक महिन्यापूर्वी पुणे पोलिसांनी क्रिकेट बॅटिंग (cricket betting)प्रकरणी मोठी कारवाई(action) केली होती. या प्रकरणाचे धागेदोरे वाशिम शहरापर्यंत असल्याने याबाबत पुणे पोलिसांनी(Pune Police) वाशिम शहर पोलिसांना माहिती दिली. शहर पोलिसांनी १३ जून रोजी कारवाई करून धारदार शस्त्रासह विराज पाटील यास अटक केली असून, त्याला पुणे येथील स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणाचे धागेदारे वाशिमपर्यंत
अनधिकृत महादेव बुक अॅप या ऑनलाइन अॅपद्वारे गतकाही महिन्यांपासून ऑनलाईन सट्टेबाजी केली जात असल्याने देशभरात ठीकठिकाणी छापेमारी(raid) करण्यात आली होती. महादेव बुक अॅप या ऑनलाईन अॅपद्वारे पुणे येथील नारायणगावमधील एका इमारतीत सट्टा खेळविला जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुणे येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ मे रोजी रात्री ११ .३० वाजता दरम्यान त्या इमारतीत छापा टाकून मोठी कारवाई केली होती. या कारवाईत ९६ जण हे लॅपटॉप (Laptop), मोबाईल व इतर साहित्याच्या मदतीने अनाधिकृत महादेव बुक अॅप या ऑनलाईन गेमींगमध्ये सट्टेबाजी करीत असतांना आढळून आले होते. त्यांच्याकडून पोलिसांद्वारे ८९ मोबाईल तसेच इतर साहित्य असा एकूण ६२ लाख ७४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात वाशिम शहरापर्यंत धागेदारे असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाल्याने त्यांनी याबाबत वाशिम येथील पोलिस यंत्रणेला माहिती दिली.
वाशिम शहर पोलिसांनी विराज पाटील यास १३ जून रोजी ताब्यात घेऊन त्याच्या जवळील थार गाडीची झडती घेतली, तेव्हा या गाडीमध्ये पोलिसांना एक धारदार शस्त्र (edged weapon) आढळून आले. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी शस्त्रासह थार गाडी जप्त केली असून, विराज पाटील विरुद्ध ४/२५ आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल(crime registered) केला आहे. तसेच पुढील कारवाईकरिता विराज पाटीलला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.