कारंजा (Wardha):- कारंजा तहसील कार्यालय परिसरात 29 एप्रिल ला दुपारी 1 वाजता एका 50 वर्षीय व्यक्तीवर प्राण घातक हल्ला झाला.
वैयक्तिक वादातून हल्ला झाल्याची सूत्रांची माहिती
त्यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली. सुभाष गाडगे वय 50 वर्ष असे हल्ल्यात जखमी (wounded)झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते कारंजा शहरातील माळीपुरा भागातील रहिवाशी आहेत. सोमवारी दुपारी ते तहसील कार्यालय परिसरात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना डोक्यावर लाकडी राफ्टर(Wooden rafters) व लाथा बुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली त्यात ते रक्तबंबाळ झाले.
कारंजा तहसील परिसरातील घटना
घटनेनंतर त्यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospitals) दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांनी सासऱ्याला मारहाण केली होती त्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळाली.वृत्त लीहेस्तोवर पोलीस कारवाईची माहिती प्राप्त झाली नाही.