खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खतांचे योग्य नियोजन करा
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन,
जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक
वर्धा ( Wardha ) येत्या काही दिवसातच पावसाळा सुरू होणार असून खरीप हंगामाला सुरूवात (Beginning of Kharif season) होणार गार आहे. आहे. यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०२४-२५ करिता ४ लक्ष ३३ हजार ३४० हेक्टर क्षेत्राचे पेरणीचे नियोजन असून आवश्यक असणारे बियाणे, रासायनिक खते आदी कृषि निविष्ठांची कमतरता भासणार नाही. यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Collector Rahul Kardile) यांनी कृषि विभागाला (Department of Agriculture) दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.. मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (Additional Chief Executive Officer) सुरज गोहाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रभाकर शिवणकर, कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे, पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी, रासायनिक खते कंपन्याचे प्रतिनिधी व खते वाहतूकदार यावेळी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी ४ लक्ष ३३ हजार ३४० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून त्यासाठी ६८ हजार ७७ क्विंटल बियाण्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले. बियाणे कंपन्यांनी नियोजनाप्रमाणे हंगामापूर्वी बियाण्यांचा पुरवठा करावा तसेच जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही, यासाठी कृषि विभागाने दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर आठ असे एकूण नऊ भरारी पथके तयार करण्यात आले
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक
खरीपासाठी १ लाख १० हजार ९१० मे. टन खताची आवश्यकता असून त्यामध्ये ३५ हजार ८२० मे. टन युरिया, एस.एस.पी २६ हजार २९० मे. टन, एम.ओ पी. २ हजार ९३० मे. टन, डी.ए. पी. १२ हजार ६०० मे. टन व संयुक्त खत ३३ हजार ३०० मे. टन खतांचा समावेश आहे. रासायनिक खत (Chemical fertilizers) कपन्यांनी कृषि विभागाच्या संपर्कात राहून मागणीनुसार योग्य पुरवठा करावा वजिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर आठ असे एकूण नऊ भरारी पथके तयार करण्यात आले आहे. कृषि केंद्र व जिल्ह्याच्या सिमेवर तपासणी करण्यात येत असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० व ०७१५२-२४३३७४, २५००९९ या संपर्क क्रमांकावर शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
तालुका निहाय मंजूर करण्यात आलेल्या आवंटनानुसार पुरवठा करण्यात यावा. रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत नियमित आढावा घ्यावा. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, चढ्या दराने खतांची विक्री होणार नाही रासायनिक खतांसोबत लिंकीग म्हणून ईतर खते देण्यात येत असल्यास तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले.