आर्किटेक्टसकडून त्यांचा प्रणालीतील दोष दूर न झाल्याने बांधकाम मंजुरीस विलंब
वर्धा (Wardha) :- सध्या बांधकाम परवानगीकरिता बीपीएमएस प्रणाली राबविली जात आहे. बीपीएमएस (BPMS) प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने परवानगी देण्यात येते. व्यावसायिक सरलतेच्या शासकीय धोरणानुसार ही पद्धत शासनाने अंगिकारली असली तरीही बांधकाम करू इच्छिणारे लोक व आर्किटेक्टस (Architects) यांच्याकरिता ही कमालीची डोकेदुखी ठरत आहे. या प्रणालीतील दोषः दोष अद्यापही पूर्ण दूर व्हायचे आहेत. तसेच ही प्रणाली वापरून बांधकाम मंजुरी(Construction approval) देणारे अधिकारी देखील अजुनही जुन्या पद्धतीमधून बाहेर आलेले नाहीत. परिणामी बांधकाम मंजुरी मिळण्यास प्रचंड विलंब लागत आहे. त्यामुळे नाहक त्रासही सहन करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.बांधकाम तपासणी शुल्क भरल्यानंतर प्रकरण नगर नियोजन विभागातून उपविभागीय अधिकाऱ्याकडे साधे ट्रान्सफर व्हायला देखील बराच वेळ लागतो. प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे विचारार्थ ऑनलाईन गेल्यानंतर तेथे उगाच गैरलागू कागदपत्रे मागितली जात असल्याचे बोलले जाते. आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन जोडल्याशिवाय प्रकरण सादरच होत नाही. मग अधिकची कागदपत्रे का मागतात, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. आर्किटेक्टसकडून त्यांचा प्रणालीतील दोष दूर न झाल्याने बांधकाम मंजुरीस विलंब
भेटीदरम्यान तहसीलदार व उपविभागीय अधिकारी कार्यालयात बांधकाम
परवानगीमध्ये मोठ्या प्रमाणात खोडा निर्माण करीत असल्याची तक्रार करण्यात आली. यावेळी डिझाईन काढल्यानंतर नागरिक त्यांच्या मर्जीने सुद्धा घरामध्ये फेरफार करीत असतात, ते फेरफार करणार नाही याबद्दलचे पत्र आर्किटेक्टना मागत असल्याचा मुद्दा यावेळी सांगण्यात आला. लेआउटचे झोन दाखले पुन्हा मागण्याची गरज नसताना प्रत्येकाला लेआउटचे झोन दाखले मागत आहेत. नागरिकांना याचा नाहक भुर्दंड भरावा लागतो. प्रत्येक वेळी अधिकारी बांधकाम सल्लागाराला पाठवण्याच्या सूचना करत असल्याची तक्रारही आर्किटेक्ट समितीने केली आहे. काहीही संबंध नसलेले चक्क प्रतिज्ञापत्रही मागितले जाते. ते सादर न केल्यास प्रकरणाची अडवणूक होत असल्याचा आरोप होत आहे.
■■ यावर चर्चेतून तोडगा काढणार
वर्धा आर्किटेक्टस असोसिएशनतर्फे (Architects Association) अध्यक्ष मकरंद पाठक,(President Makarand Pathak,) सचिव आलोक बेले, पीपी देशमुख व दफ्तरी यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, (Collector Rahul Kardile) उपजिल्हाधिकारी गंधे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी जिल्हाधिकारी (Collector )यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत अडचणी समजून घेत व संबंधितांना सूचना निर्गमित करून या अडचणींचे त्वरित निराकरण करून बांधकाम निराकर परवानगीत गतिशीलता आणण्याचे आश्वासन दिले. त्या अनुषंगाने त्वरित पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.