वर्धा(Wardha):- आर्वी मतदार संघाचा पेच सुटता सुटत नाही. दादाराव केचे ज्येष्ठ तर सुमित वानखेडे नवीन ठरत असल्याने पक्षश्रेष्ठ गोंधळले आहे. आता कार्यकर्तेच म्हणायला लागले सुधीर दिवे यांना उमेदवारी दिल्यास भाजपसाठी हा सुवर्ण मध्य ठरू शकतो.
आर्वी मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते विचारात पडले
तीन वर्षांमध्ये उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांचे निकटवर्तीय सुमित वानखेडे यांनी आर्वी मतदार संघाचा विकास कामे करून कायापालट केला. आपला जनाधार तयार केला. वानखडे म्हणतात आम्ही परीक्षा दिली निकाल पक्षनेते देतील. दुसरीकडे आमदार दादाराव केचे ही माझी शेवटची टर्म राहील, मी संघटना बांधण्यामध्ये खूप मेहनत घेतली हे पक्षश्रेष्ठींना ठासून सांगतात. त्यामुळे मला उमेदवारी मिळावी असा त्यांचा दावा आहे. यामुळे आर्वी मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते विचारात पडले आहे. त्यापेक्षा या मतदारसंघात सुधीर दिवे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठीने विचार करावा. सुधीर दिवे यांचा यांचा मतदारसंघातील पक्ष बांधणीत मोठा वाटा आहे. २०१४, २०१९ निवडणूक भाजप उमेदवारासोबत काम केले व विजय प्राप्त केला. प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते आहेत. कार्यकर्त्यांची मागणी आता सुधीर दिवे यांच्या नावाकडे वळली आहे.
महात्मा साखर कारखाना व मानस उद्योग समूहाचा नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांना राजकारणात व राजकारणा पलिकडे मानणारा मोठा वर्ग वर्धा जिल्ह्यात आहे, ही सुद्धा दिवे यांची जमेची बाजू आहे. सुधीर दिवे यांच्या नावावर सर्वांचे एकमत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहेत.