दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
बारावी विज्ञान शाखेत पूर्वशा सिंग, वाणिज्य शाखेत हिंदवी शिंगोटे प्रथम
वर्धा (Wardha) : सिबिएसई केंद्रीय माध्यमिक शिक्षण (CBSE Central Secondary Education) मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी तसेच बारावीच्या (10th and 12th) परीक्षेचा निकाल (Result) सोमवारी १३ मे रोजी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. काही विषयांत पैकीच्या पैकी गुण विद्यार्थ्यांनी मिळविलेत. दहावी, बारावीच्या परीक्षेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. बारावीमध्ये भवन्स लॉयड्स विद्या निकेतनच्या (Bhawans Lloyds Vidya Niketan) पूर्वशा सिंग हिने विज्ञान शाखेत आणि वाणिज्य शाखेत हिंदवी शिंगोटे या अव्वल राहिल्या. दहावीच्या परीक्षेतही भवन्स लॉयड्स विद्या निकेतनच्या अर्णव मकेश्वर आणि अर्नवी सिंघम यांनी ९९ टक्के गुण मिळविलेत. वर्धा जिल्ह्यात सिबिएसईच्या दहावीच्या २१ शाळा आहेत. चार शाळांमध्ये बारावी पालकांनाही उत्सूकता असून सिबिएसईच्या दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर होती. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव झाला. बारावीच्या विज्ञान शाखेत भवन्स लॉयड्स विद्या निकेतनच्च्या पूर्वशा सिंग हिला ९४ टक्के, आदिती साहू हिला ९१.६०, रिषभ जैनला ९१ टक्के, श्वेता दासला ९०.२० टक्के गुण मिळालेत. वाणिज्य शाखेत हिंदवी शिंगोटेला ९५ टक्के, अभिराम नाम्बीयार ९४.४० टक्के आणि सौम्या जाजोदीयाला ९१.४० टक्के गुण मिळालेत. –
सेलू (काटे) येथील जवाहर नवोदय विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली.
इयत्ता बारावीचा निकाल १०० टक्के लागला. बारावीमध्ये येथील विराज वानखेडे याला ९३. २ टक्के,( Viraj Wankhede.) प्रज्ज्वल बाजारे याला ९० टक्के तर हिताक्षी जुगनाकेला ८९. २ टक्के गुण मिळालेत. बारावीत येथील ३७ पैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत