निकटवर्तीयांना पासेस दिल्याची कुजबूज करत काहींमध्ये संताप
देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (BJP VVIP passes) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर्ध्यातील दौरा आटोपला. पण, दौऱ्यानंतर विविध किस्से समोर येऊ लागले आहेत. त्यात व्हिव्हीआयपी पासेसवरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. यावरूनच दोन दिवसांपूर्वी भाजप कार्यालयात (BJP office) कोणी नसताना खुर्थ्यांची फेकफाक करत संताप व्यक्त केल्या गेल्याचे सूत्रांकडून कळते. निकटवर्तीयांना पासेस दिल्याची कुजबूज करत काहींमध्ये चांगलाच संताप व्यक्त होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते. पंतप्रधानांच्या आवागमनाप्रसंगी हेलीपॅड तसेच सभेच्या ठिकाणी काही नेते, तसेच पदाधिकारी होते. त्यांना व्हिव्हीआयपी पासेस देण्यात आल्यात. पंतप्रधानांचे हेलिपॅडवर, व्यासपीठावर आगमन होताना दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २५ जण तर कार्यक्रम समाप्तीनंतर जाताना व्यासपीठाजवळ आणि हेलिपॅडवर प्रत्येकी २५ जणअशी १०० जणांना परवानगी मिळाली. त्यांना व्हिव्हीआयपी पासेस मिळाल्यात. पण, नंतर याच पासेसवरून चांगलेच वादळ निर्माण झाले. ज्यामुळे (BJP office) भाजपात अंतर्गत चर्चाना उधान आले.
शंभर जणांमध्ये (BJP office) भारतीय जनता पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या नातलगांना यादीत समावेशित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या काही निष्ठावंतांना मात्र जबर धक्का बसला. यादीवरून काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच कुजबूज सुरू झाली. पासेसमध्ये नातलगांची, निकटवर्तीयांची नावे टाकली गेल्याची चर्चा काही जणांकडून होत आहे. यावरून नाराजीदेखील व्यक्त होत आहे. कुटुंबातील तसेच ज्यांचा पक्षाच्या कार्यक्रमांत फारसा सहभाग नसतो, अशा व्यक्तींना पारोरा दिल्या गेल्याचे सांगत याबाबत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. नातलगांना पासेस दिल्या गेल्याचा आरोप करत काहींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे सूत्रांकडून कळते.
पासवरील नाव चुकल्याने संताप
■■ व्हिव्हीआयपीमध्ये समावेशित एका पदाधिकाऱ्याचे पासवरील नाव चुकले होते. नाव चुकलेले असल्यामुळे पदाधिकाऱ्याला जाता आले नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्याने तीव्र संताप व्यक्त केला. सभा संपल्यानंतर थेट कार्यालय गाठले. त्याने तेथे जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर कार्यालयात कुणीच नसल्याने त्याने आपला राग खुर्त्यांवर काढल्याचे सांगण्यात येते.
व्हिव्हीआयपी पासवरून रुसवेफुगवे
■■ पतप्रधान आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी जाण्याकरिता अनेक जण इच्छूक. पण, निवडक जणांनाच यादीत स्थान मिळाले. त्यातही (BJP office) यादीत काही जणांच्या नातलगांचा भरणा राहिल्याची चर्चा आहे. त्यामुळे या यादीवरून तीव्र नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.