समृद्धी महामार्गावर विरूळ पेट्रोल पंपावरील घटना
विनोद महाजन
वर्धा (Wardha Crime) : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या एका महिलेला (Petrol pump) पेट्रोल पंपावर चहा पिणे महागात पडले. ट्रॅव्हल्स मध्ये असलेल्या सामानांमधून दागिन्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. ही (Wardha Crime) घटना वर्धा जिल्ह्यातील विरूळ येथील (Samriddhi Highway) समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर घडली. ही घटना आज 21 मार्चला सकाळी नऊ वाजता घडली.
अज्ञात चोरट्यांची कसून चौकशी सुरू
फिर्यादी महिलेचे नाव जयश्री सतिश वडसकर, वय 40, राहणार शिवतेज नगर, चिंचवड, जिल्हा पुणे असे आहे. पुणे येथून नागपूरला जाणाऱ्या MH12VT6362 क्रं. विजयानंद कंपनीच्या ट्रॅव्हल्स आई-वडिलांसह त्या काल रात्री निघाल्या होत्या. (Samriddhi Highway) प्रवास करताना आज सकाळी विरूळ येथील टोल नाक्यावर बस काही वेळ थांबली. याच दरम्यान जयश्री वडस्कर खाली उतरल्या. त्यांनी चहा व नाश्ता घेतला. नंतर त्या ट्रॅव्हल्समध्ये आपल्या जागेवर बसायला गेल्या. त्यांची बॅग सीटवर नव्हती. म्हणून त्यांनी आरडाओरड केली. त्यांची (Wardha Crime) बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पुलगाव पोलिसांमध्ये तक्रार केली.
चहा घेण्याकरिता त्याखाली येत असताना अज्ञात चोरट्यांनी पाहिले नंतर क्रेटा चारचाकी क्र. MH12WU9074 मधील एका अनोळखी ईसमाने ट्रॅव्हल्समध्ये जावुन फिर्यादीचे आई वडीलाचे सिट वरील बॅग मधील 1) 05 तोळे वजनाचे सोन्याचे पदक असलेले मंगळसुत्र ज्यामध्ये काळे मनी असलेले अंदाजे किंमत 1,50,000/- रु 2) 04 तोळे वजनाचे सोन्याचे पदक असलेले मंगळसुत्र ज्यामध्ये काळे मनी असलेले अंदाजे किंमत 1,20,000/- रु 3) 01 तोळे वजनाचे सोन्याचा पोहेहार अंदाजे किंमत 30,000/- रु 4) 01 तोळे वजनाचे सोन्याचे कानातील दोन छुमके अंदाजे किंमत 30,000/- रु 5) 04 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन कानातील रिंग अंदाजे किंमत 12,000/- रु असा एकुण 11 तोळे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने एकुण जु.कि. 3,42,000/- रु चा माल चोरुन क्रेटा गाडी मधील तीन ईसमा सह बुसुन पळून गेले. (Wardha Crime) अश्या लेखी फिर्याद वरुन गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे