मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित; ६ लाख रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक
वर्धा (E-Office System) : वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात राबविलेल्या ई-ऑफिस प्रणालीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. २०२४-२५ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कृत करण्यात आले. मुंबई येथे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (E-Office System) ई-ऑफिस प्रणालीला (E-Office System) राज्यातील दुसर्या क्रमांकाचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा पुरस्कार स्विकारला.
नवीन तंत्रज्ञानामुळे प्रशासनाच्या कामात नवनवीन बदल करणे आवश्यक ठरते. वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Collector Rahul Kardile) यांनी जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयात (E-Office System) ई-ऑफिस प्रणाली सन २०२३-२४ मध्ये यशस्वीरित्या राबविली. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता आली. या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान २०२३-२४ स्पर्धेत वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी व आताचे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Collector Rahul Kardile) यांच्या कार्य कर्तृत्वाला द्वितीय पारितोषिक मिळाले. विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणार्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या तालुकास्तरावर देखील त्यांनी (E-Office System) ई -ऑफिस प्रणाली सुरू केली होती. त्यामुळे फायलींचा पसारा कमी करण्यात मदत झाली. नांदेडमध्येही त्यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे.
संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात (E-Office System) ई-ऑफिस प्रणाली राबविण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना ६ लक्ष रुपयांचे द्वितीय राज्यस्तरीय पारितोषिक वितरित करण्यात आले आहे. महसूली विभागातील बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकरणामुळे प्रशासनाच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणे आवश्यक असते. त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशिलता आणण्यासाठी तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान व स्पर्धा आयोजित केली जाते. या अभियानात वर्धा जिल्ह्याला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. हा पुरस्कार (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तत्कालीन (Collector Rahul Kardile) जिल्हाधिकारी कर्डिले यांनी स्विकारला.