■ ज्येष्ठ समाजसेवी मोहन अग्रवाल यांचे प्रतिपादन
■ रोहणा येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा ( Wardha ) रोहणाः दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर हा एक अतिशय महत्त्वाच्या टप्पा आहे. शैक्षणिक दृष्ट्या योग्य दिशा निवडण्याची ही एक निर्णायक वेळ असते. त्यामुळे अशा वेळी विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरावे असे मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे ही काळजीची गरज आहे. विविध क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांना त्या-त्या क्षेत्रातील जाणकारांचे विस्तृत मार्गदर्शन लाभेल, यासाठी अशी शिबिरे हा एक स्तुत्य उपक्रम आहे., असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी व उद्योजक मोहन अग्रवाल यांनी केले. २३ मे रोजी रोहणा येथील कोल्हटकर कला महाविद्यालयात स्वर्गीय गायत्रीदेवी अग्रवाल सेवा संस्था, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम, लॉयन्स क्लब वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मार्गदर्शन शिबिरात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन माजी प्राचार्य फनिंद्र रघाटाटे यांनी दिप प्रज्वलित करून केले. यावेळी मंचावर गौरखेडाचे सरपंच तुषार नयासे, ऑल इंडिया शास्त्री राही, सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान प्रदेश कार्याध्यक्ष राजु लभाणे, लायन्स क्लबचे अध्यक्ष विजय सत्यम, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश टाकले, आदर्श शिक्षक मोहन मोहिते, आर्वी येथील ज्येष्ठ समाजसेवक चेतन अग्रवाल, पंकज अग्रवाल, राजेश धोपटे, महेश अग्रवाल अतिथी मार्गदर्शक साधना उमाळकर, कॅप्टन मोहन गुजरकर, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, मुरलीधर बेलखोडे, सिहान मंगेश भोंगाडे, विलास कुलकर्णी, नामदेव आखाडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. ज्ञान आणि शिक्षण या वेगळ्या बाबी असल्या तरी एकमेकांना पूरक आहे. ज्या गोष्टीचे ज्ञान विद्यार्थ्यांना असते किंवा ज्या विषयाकडे त्यांच्या कल असतो त्या विषयाचे अघावत शिक्षण त्यांना लाभले तर आजच्या विद्यार्थी त्याला आवडत्या क्षेत्रात प्रगतीचे नवे आयाम निर्माण करू शकतो. असे मत उद्घाटक प्राचार्य रघाटाटे यांनी व्यक्त केले. शिबिराला साधना उमाडकर, अनिल निमगळे, कॅप्टन मोहन गुजरकर, मुरलीधर बेलखोडे, मंगेश भोंगाडे, इमरान राही यांचे मार्गदर्शन लाभले.
– गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार
राधा बोबडे, समीक्षा बोबडे, संचल कुमरे या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. तसेच या शिबिराचा लाभ घेणाऱ्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नामदेव आखाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विलास कुळकर्णी यांनी केले. आभार डॉ. तिर्थनंदन बन्नागरे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. महेंद्र झलके, डॉ. ममता साहू, डॉ. राजेंद्र माणिकपुरे, डॉक्टर नितीन गोरखेडे, अभियंता हर्षद मेश्राम, पंकज नगरे उपस्थित होते.