- मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
शिक्षक भरती करण्याची उपसरपंच कोहळे यांची मागणी
देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा ( Wardha ) साहूर :- वडाळा (शहीद) हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला अगदी दुर्गम भागात आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) शाळेचे एक ते सात वर्ग असून सात वर्गांना केवळ तीनच शिक्षक असल्याने गरीब शेतकरी शेतमजुरांची मुले शिक्षणापासून वंचित असून त्यांचे शैक्षणिक ( Educational ) भवितव्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील उपसरपंच (Deputy Sarpanch ) बबन कोहळे (Baban Kohle ) यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे अनेक वेळा शिक्षक भरती करण्याबाबत सूचना केल्या असून त्यांच्या सूचनेकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपसरपंच बबन कोहळे यांनी केला असून येथील जिल्हा परिषद शाळेत ताबडतोब शिक्षक भरती करावी, अन्यथा आम्ही जन आंदोलन पुकारू असा अल्टिमेटम सुद्धा उपसरपंच बबन कोहळे यांनी दिला आहे. भारतातील एकही व्यक्ती निरक्षर नसावा हा देश १०० टक्के साक्षर व्हावा हा शासनाचा एकमेव उद्देश असून ज्या मुलांच्या तोंडावर शाळेचं व शिक्षणाचं नावही येत नाही ज्याला शिक्षणाचा दूर दूर गंध नाही अशाही मुलांना शासन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. ‘स्कूल चले हम’ (‘School Chale Hum’ ) सारखे उपक्रम शासन राबवत आहे
– गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
तर दुसरीकडे वडाळा (Wadala) येथील जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळेत सात वर्ग असून केवळ तीनच शिक्षक असल्याने येथील शाळेत शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू आहे. परिणामतः गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. वडाळा शहीद येथे सर्व शेतकरी व शेतमजूर वर्ग असून अत्यंत गरीब असल्याने ते आपल्या पाल्यांना बाहेरगावी महागड्या इंग्रजी शाळेतील (English school) शिक्षण देऊ शकत नाही. आपण अशिक्षित व कमी शिकलो असलोतरी आपला मुलगा शिकावा सुशिक्षित व्हावा त्याने छोटी-मोठी नोकरी करावी अशी या सर्वसामान्य आई- वडिलांची अपेक्षा असते त्या अनुषंगाने येथील नागरिकांनी वडाळा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आपल्या पाल्याचेनाव दाखल केले. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक दिवसापासून सात वर्ग आणितीनच शिक्षक असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. एवढेच नव्हे तर अनेक शाळांमध्ये शिक्षक भरतीबंदअसल्याने वर्ग सात खोल्या चार शिक्षक दोन अन शिकवीन कोण अशी गंभीर समस्या दिसून येत असल्याने याबाबत येथील उपसरपंच बबन कोहळे यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे व अधिकाऱ्याकडे शिक्षक भरतीची मागणी केली मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपलीच दाखवण्यात आली.