वीज कंपनीला वादळाचा ४४ लाखांनी फटका
वर्धा (Wardha) :- मागील महिन्यात जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वादळ झाले. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Huge loss to farmers) झाले. शेतीसोबतच वीज कंपनीलाही(Electricity company along with agriculture) वादळाचा जबर झटका बसला.. वादळात वीज कंपनीचे तब्बल ४४ लाख ५१ हजार रुपयांचे नुकसान झाले. अलिकडच्या काळात वादळ, अवकाळी पावसाच्या प्रमाणात वाढ झालेली निदर्शनास येते. मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा आल्याने विविध प्रकारचे नुकसान होते. वादळात घरे, गोठे, पिक, इमारती झाडे आदींचे नुकसान होते. त्यात वीज कंपन्यांशी संबंधित बाबीचेही नुकसान होते. वादळात महावितरणचे खांब, वीज वाहिन्या, रोहित्र आदींचेनू कसान होते. वादळात खांब वाकतात, कोसळतात. विद्युत वाहिन्यात मोठ्या प्रमाणात तुटतात. तसेच रोहित्रांनाही त्याचा फटका
एप्रिल महिन्यात आलेल्या वादळात महावितरणचे जबर नुकसान झाले होते.
महावितरणला वादळामुळे वर्धा विभागात(Wardha Division ) तब्बल ४४ लाख ५१ हजार रुपयांचा फटका बसला आहे. त्यात आर्वी सर्कलमध्ये (Arvi Circle ) २० लाख ४७ हजार रुपयांचे नुकसान झाले. हिंगणघाट सर्कलमध्ये ( Hinganghat Circle) १२ लाख ४८ हजार तर वर्धा सर्कलमध्ये ( Wardha Circle) ११ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या साहित्यात उच्च दाब, लघू दाब लाईनचे पोल, उपरी वीज वाहिन्या, वितरण रोहित्राच्या नुकसानीचा समावेश आहे. अनेक ठिकणी उच्च दाब, लघु दाब लाईनचे पोल वाकले, जमिनदोस्त झालेत. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उपरी वीज वाहिन्या तुटल्याने नुकसान झाले. तसेच वीज, अवकाळी पाऊस, वादळात वितरण रोहित्रांचेही नुकसान झाले.
■■ नुकसानीनंतर महावितरणकडून वेगाने दुरूस्तीची कामे करण्यात आलीत. बहुतांश ठिकाणच्या दुरुस्तीचे कामे वेगाने उरकत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला
वर्धा विभागात उच्च दाब वाहिन्याचे ८३ खांबांचे ४ लाख ५२ हजारांचे नुकसान झाले. लघू वाहिन्यांचे २९० खांबांचे १० लाख ३५ हजार रुपयांचे, उपरी वीज वाहिन्यांमध्ये उच्च दाब वाहिन्यांचे ७.६१ किलोमीटरचे ६ लाख ५४ हजारांचे तर लघू दाब वाहिन्यांचे उपरी वीज वाहिन्यांचे १८.७५ किलोमीटरचे १८ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच ८ वितरण रोहित्रांचे ४ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची सूत्रांची माहिती आहे.