वर्धा (Wardha ) अडथळ्यांची शर्यत पार करून उत्पनाचे नवनवे मार्ग शोधण्याऱ्या राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या उत्पन्नात भर घालण्यासाठी आता एक नवी योजना जाहीर केली आहे. १३ सप्टेंबर रोजी जाहीर झालेली ही योजना एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी आहे. जुनाट बसेसमुळे रस्त्यात लालपरीचे चाके कधीही थांबतात, अचानक लागणाऱ्या आगी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघटनांकडून संपाचे वारंवार मिळणारे इशारे आदी एक ना अनेक अडथळे पार करीत एसटीच्या लालपरीची धावपळ सुरु आहे. तीच्या या रात्रंदिवसाच्या परिश्रमाला उत्पन्नाची झालर लागावी म्हणून एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जातात. गेल्यावर्षी महिलांना सरसकट ५० टक्के प्रवास
* राज्य परिवहन विभागाची योजना
काही चालक व वाहक अलीकडे प्रवाशांकडे दुर्लक्ष करत असल्याचीही तक्रार आहे. बसेसमध्ये जागा असूनही प्रवाशांनी कुठे हात दाखविला तर एसटीचे चालक वाहक त्या प्रवाशांना दुर्लक्षित करून पुढे निघून जातात. अशा तक्रारी वाढल्या असतानाच यामुळे एसटीलाहोणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नालाही फटका बसत आहे. ते ध्यानात घेऊन एसटी चालक वाहकांसाठी उत्पन्नावर प्रोत्साहन भत्ता योजना जाहीर केली आहे. १३ सप्टेंबर रोजी राज्यातील मुंबई, नागपुरसह सर्व विभाग नियंत्रकांना या योजनेसंबंधिची माहिती पाठविण्यात आली आहे.
भाड्यात सवलत जाहीर झाली आणि एसटीला महामंडळाने लक्ष्मी पावली. एसटीच्या प्रवासी संख्येत तसेच आधारित उत्पन्नातही लक्षवेधी भर पडली. सुगीचे दिवस आल्यागत एसटीबसेस भरभरुन धावत आहेत. एकीकडे हे असे सुखद चित्र असतांना २१ सप्टेंबर ते २० आक्टोबर या २० दिवसाच्या प्रायोगिक तत्वावर महामंडळाकडून ही योजना राबविली जाणार आहे. या दिवसातील प्रत्येक फेरीच्या उत्पनाची गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या उत्पनाची तुलना केली जाईल. त्या नंतर गेल्यावर्षी या कालावधीत किती उत्पन्न होते आणि त्यापेक्षा किती जास्त उत्पन्न यावेळी मिळाले त्या आकड्यांचा हिशोब केला जाईल.
अशी आहे योजना
■■ चालक-वाहकांना मिळणार २० टक्के
प्रत्येक आगाराचे लेखाकर आणि सहाय्यक वाहतूक अधिक्षक आर्थिक ताळेबंद काढून रक्क्कम तपासतील, त्यानंतर गेल्यावर्षीच्या उत्पन्नापेक्षाा जेवढी जास्त रक्कम मिळाली त्याच्या २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक-वाहंकांना (१०-१० टक्के) विभागातून दिली जाईल.
■■ तर मिळणार नाही भत्ता
या कालावधीत परिश्रम घेउन, विशेष प्रयत्न करून चालक व वाहकाने एसटीच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न ओतले आणि चुकून त्यांच्या पैकी कुण्या चालक वाहकाने प्रवाशांसोबत गैरवर्तन केले, त्याची तक्रार आल्यास त्या चालक व वाहकास प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळणार नाही.