– यशोदिप हायस्कूल येथे १५ दिवसीय संस्कार शिबिराचा समारोप
संस्कार शिबिरातून अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित होते – कॅप्टन मोहन गुजरकर यांचे प्रतिपादन
वर्धा (Wardha) : ‘शालेय शिक्षणासोबत संस्कारक्षम ज्ञान देणे आवश्यक असून या दृष्टिकोनातून यशोदिप विद्यालयाने ( Yashodeep Vidyalaya) आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिरातून (summer camp) विद्यार्थ्यांना कला, नृत्य, बौद्धिक खेळ, साहस खेळ, क्राफ्ट, संगीत, नाट्य कला, संवाद व संभाषण कौशल्य शिकायला मिळाले मिळाले आणि त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व विकासीत करण्याचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. खऱ्या अर्थाने संस्कार शिबिरातून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकासीत होत असते, असे प्रतिपादन प्रहार समाज जागृती (Prahar community) संस्थेचे अध्यक्ष तथा एन. सी. सी. (N. C. C.) अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर(Captain Mohan Gujarkar) यांनी केले. यशोदिप हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित १५ दिवसीय बालसंस्कार शिबिराच्या (Childcare camp) समारोप प्रसंगी ते बोलत होते. संस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशोदिप हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष अतुल रुईकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध शायर तथा समाजसेवी इमरान राही, एन. सी. सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, समाजसेवक राजू लभाणे, सुरेश बरे व मुख्याध्यापिका अनधा रुईकर उपस्थित होते. या प्रसंगी इमरान राही म्हणाले मुलामुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळाल्यास कृतिशील व्यक्तिमत्त्व तथा योग्य संस्कार मिळाल्यास संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व विकसित होत असते आणि याच धर्तीवर शिबिरातून मिळालेले प्रशिक्षण महत्वाचे आहे. पुढे अध्यक्षस्थानी बोलताना अतुल रुईकर (Atul Ruikar) म्हणाले विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला असून या पुढेही आमचा असाच मानस राहणार आहे. कार्यक्रमाचे संचालन वर्षा वादाफळे यांनी केले. आभार अमोल मानकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता लिला वाघ, दिव्या शर्मा, आशिष नाखले, विजयभुजाडे, प्रियकांतगायकवाड, शितल सुळे, ज्योत्स्ना धांदरे यांनी सहकार्य केले. समारोप कार्यक्रमाला नागरिक विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– शिबिरात विद्यार्थ्यांनी घेतले विविध प्रकारचे प्रशिक्षण-
१५ दिवसीय शिबिरात संगीत, नृत्य, गायन, वाद्य, नाट्य, चित्रकला, कराटे, संगणक प्रशिक्षण, पथनाट्य, कराटे, योगा, बौद्धिक खेळ, क्राफ्ट व इंग्लिश संभाषण कलेचा समावेश असून विद्यार्थ्यांना अमोल मानकर, सुबोध कपले, यशवंत पलेरिया, बबरूवान धनविज, प्रकाश गवारकर, श्वेता सबाने, श्रद्धा पाटील, मोनाली भोले व शुभांगी भोयर यांनी शिबिरात मार्गदर्शन केले.