समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करणारी पिढी घडवणे गरजेचे अँड. विजयसिंह ठाकूर
वर्धा ( Wardha ) :- कुठलाही खेळ आणि त्याच्या नियमित सरावत्या व्यक्तीचे शरीर आणि मन सुद्ध ठेवते. मात्र कराटे या क्रीडा प्रकारात या व्यतिरिक्त सुरक्षितता आणि चपळता खेळाडूंना लाभते. तरुण-तरुणीना त्वतःची सुरक्षितता आणि व्यक्तिगत्व विकासासाठी या खेळात मोठ्या प्रमाणात सहभागी करणे आवश्यक आहे. या खेळामुळे स्वताचे, कुटुंबाचे, समाजाचे व पर्यायाने राष्ट्राचे संरक्षण ( Defense nation ) करण्याचे सामर्थ्य अंगी बाळगणारी पिढी घडण्याचे कार्य सिद्धीस जाते, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अँड. विजयसिंह ठाकूर ( Vijay Singh Thakur ) यांनी केले.रामनगर येथील उत्कर्ष उद्यान येथे स्पोर्ट शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया ( Association of India ) द्वारा संचालित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यश म्हणून ते बोलत होते. यावेळी स्पोर्ट कराटे असोसिएशनचे वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही, वर्धा नगरपरिषदेच्या माजी महिला व बालकल्याण (Women and Child Welfare ) सभापती वंदना भुले, संस्थेचे उपाध्यक्ष मोहन मोहिते, संचालक सभासद प्रकाश खंडार, भगवानदास आहुजा, शेखर भागवतकर, रामनगर येथील संत तुकाराम मंदिरचे सचिव ज्ञानेश्वर हिवसे, माजी असिस्टंट पोलीस कमिशनर गंगाधर पाटील, असोसिएशन राभाराद प्रवीण पेठे, सचिन झाडे, माजी नगरसेवक लखनसिंग ठाकूर, समाजसेवक विनोद टावरी, राजू लभाने यांच्यासह आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन स्पोर्ट शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिहान मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनात रामनगर शाखा प्रशिक्षक सेन्साई पूजा गोसटकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कल्याणी भोंगाडे यांनी केले. आभार सेम्पाई पलक लक्षणे यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता तेजस निवल, नेहा गोल्हर, प्रथमेश धाबरडे, अवंतिका तपासे, डॉ. जितेंद्र खेवले, पुष्पा तपासे, तसलीम अन्सारी, मानव कडू रजना उमेश दरणे, हेमा राठोड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे आई- -वडिल व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्राचे वाटप
मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट ( Black belt ) भार्गव खेवले, पर्पल बेल्ट तीर्थ दरणे, शरयू वेगडे, स्वानंदी सुरकार, ब्ल्यू बेल्ट रुजान बागमोरे, निल नेहारे, प्रौन बेल्ट मानवी राठोड, कृतिका तपासे, रेहान अन्सारी, क्रिजल नेहारे, माही माही राठोड, ऑरेंज बेल्ट प्रतीक कचाके, तृष्णा सोनुणे, रोशन देरणे, समीक्षा म्हैस्कर, इच्छा वैरागडे, अर्णव कायरकर, तर येलो बेल्ट करिता रिद्धीमा रामटेके, गुरुमीत देवताळे, नुजहत अन्सारी, मानव कडू, अदविका इंगळे, रुद्रांश काळे व इत्यादी विद्यार्थ्यांना कराटे बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.