– सध्या बाजारात कपाशीचे १ लाख २० हजार पॅकेट बियाणे उपलब्ध आहे.
सोयाबीनचे १८ हजार ५०० क्विंटल तर तुरीचे ७५० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. करण्यात आले आहे.
वर्धा (Wardha) :- खरीप हंगाम लवकरच सुरू होत आहे. पावसाळा सुरू होण्यास वेळ असून बाजारात बियाणे (seed) उपलब्ध होऊ लागले आहे. पेरणीसह खरेदीला अवकाश असला तरी बाजारात कपाशी, सोयाबीन, तूर (Cotton, soybeans, tur) आदी बियाणे उपलब्ध झाले आहे. सध्या बाजारात कपाशीचे एक लाख २० हजार पॅकेट बियाणे उपलब्ध झाले आहे. बाजारात अद्याप शेतकऱ्यांची बियाणे खरेदीकरिता पावले वळलेली नसली तरीही बियाणे मात्र आलेले आहे. खरीप हंगाम शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा हंगाम आहे. वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामात (Kharif season) कपाशी, सोयाबीन, तूर ही पिके मुख्य पिके आहेत.
■■ काही वर्षात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला
त्याकरिता प्री मान्सून लागवड हा घटकही महत्त्वाचा मानण्यात आला. त्यामुळे काही वर्षे १ जूननंतरच
शेतकऱ्यांना कृषी केंद्रांतून बियाणे खरेदी करता यायचे. यावर्षी मात्र शेतकऱ्यांना लवकरच बियाणे मिळणार आहे.
कपाशीचा पेरा आणि तुरीच्या लागवडीचे क्षेत्र आहे. सर्वाधिक असतो. त्यानंतर सोयाबीन बाजारात दरवर्षी वेगवेगळ्या कंपनीच्या बाजारात उपलब्ध होतात. मागील वर्षीपर्यंत जून महिन्यात कपाशीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले जायचे. यावर्षी मात्र मे महिन्यातच बियाणे उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्या गेले. त्यानुसार बाजारात कपाशी, सोयाबीन, तूर (Cotton, soybeans, tur ) आदी पिकांचे बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. बाजारात बियाण्यांचा तुटवडा निर्माणहोणार नाही, या दृष्टीने कृषी विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. वेळेवर बाजारात बियाणे आल्यास बियाणे खरेदीकरिता रांगा लागतात. शेतकयांचीही नियोजन करताना अडचण होते. प्रशासनालाही नियोजन करताना धावपळ होते. अशा स्थितीत आधीच नियोजन करत यावेळी बाजारात कपाशीचे बियाणे उपलब्ध यापूर्वी मागील चार ते पाच वर्षे टप्प्याटप्प्यात बियाणे विक्रीची परवानगी मिळायची. कंपनीपासून कृषी केंद्रांपर्यंत बियाणे येण्यासाठी तारखा दिलेल्या राहायच्या. १ जूननंतरच कृषी केंद्र धारकांना बियाणे शेतकऱ्यांकरिता विक्रीची परवानगी होती. यावर्षी मात्र १५ मेपासून बाजारात बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे.