वर्धा जिल्हयातील उद्योजकांना दिलासा
राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत केली होती विनंती
वर्धा (MIDC) : वर्धा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच एमआयडीसीचे (MIDC) जिल्हा कार्यालय चंद्रपूर येथील प्रादेशिक कार्यालयाशी संलग्न करण्यात आले होते. ही बाब वर्धा जिल्ह्यातील उद्योजकांना अडचण निर्माण करणारी ठरली. याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील उद्योजकांना (Entrepreneur) दिलासा देणारा आदेश निर्गत झाला आहे. वर्धा एमआयडीसीचे कार्यालय पूर्ववत नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयालाच सलग्न करण्यात आले आहे.
वर्धा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) जिल्हा कार्यालय नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाशी सलग्न होते. मात्र मध्यंतरी चंद्रपूर येथील प्रादेशिक कार्यालयासोबत सलग करण्यात आल्याने वर्धा जिल्ह्यातील उद्योजकांकरिता ही बाब अडचणीची ठरणारी झाली. वर्धा जिल्ह्याच एमआयडीसी कार्यालय नागपूर प्रादेशिक कार्यालयासोबतच संलग्न असावे, अशी आग्रही मागणी होऊ लागली. अखेर (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतचा आदेश 14 जानेवारी रोजी निर्गत केला.
चंद्रपूर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) प्रादेशिक कार्यालय अंतर्गत असणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील सर्व कार्यरत व प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रातील कामकाज नागपूर प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत वर्ग करण्यात आले आहे. वर्धा क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय हे प्रादेशिक कार्यालय नागपूर अतर्गत कार्यरत राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोबतच चंद्रपूरच्या प्रादेशिक कार्यालयाने त्यांच्याकडील वर्धा जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रांमधील नसती कागदपत्रे तत्काळ नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात वर्ग करण्याची कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. या आदेशामुळे वर्धा जिल्ह्यातील उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.
आमदार सुमित वानखेडे यांनी विधानसभेत वेधले होते लक्ष!
वर्धा विधानसभा क्षेत्रातील उद्योजकांनी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर (Minister of State Pankaj Bhoyar) यांना निवेदन देऊन वर्धा जिल्ह्याचे एमआयडीसी कार्यालय नागपूर प्रादेशिक सलग्न ठेवावे, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यामध्ये वर्धा (Wardha) जिल्ह्यातील उद्योजकांकरिता सोयीस्कर असून तेच कायम ठेवण्याची विनंती केली. तसेच आर्वी विधानसभा (Arvi Assembly) क्षेत्राचे आमदार सुमित वानखेडे (MLA Sumit Wankhede) यांनीही अधिवेशनादरम्यान विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यांनी देखील (MIDC) एमआयडीसी कार्यालयाचे कामकाज नागपूर ठेवण्याची मागणी केली होती.
वर्धा जिल्ह्यात एकूण औद्योगिक क्षेत्र सहा आहेत. (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे 610.87 हेक्टर जमीन असून 848 भूखंडाचा विस्तार झाला आहे. बहुतांश भूखंडाचे वितरण झाले असून काही उद्योगही सुरू आहेत.