देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (Wardha Online fraud) : इंटेरिअर डिझायनिंगच्या (Interior designing) नावाखाली आरोपीने लाखो रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. वर्ध्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात आरोपीस अटक केल्याची माहिती मिळताच पुण्यात अशाच पद्धतीत फसगत झालेल्यांनी वर्धा गाठून येथील पोलिसांना माहिती दिली. (Wardha Online fraud) फसवणूक करणाऱ्याची पद्धत, बोलणे या सगळ्याच बाबी चक्रावून टाकणाऱ्या असल्याचे सांगण्यात येते. काहींना तर पूर्ण खातरजमा करत फुंकून पाऊल टाकत असतानाही फसगतीला सामोरे जावे लागल्याची माहिती आहे.
वर्ध्या पोलिसांनी आरोपीस अटक केल्याची माहिती
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यातील एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने घराच्या इंटेरिअर डिझाईनच्या (Interior designing) कामाकरिता निवड केली. निवड केलेल्या व्यक्तीने त्यांच्याकडून काही रक्कम उकळली. मात्र त्यानंतर काम करण्यास चालढकल चालविली. (Wardha Online fraud) फसगत झाल्याचे लक्षात नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीस अटक केली. आरोपीस अटक केल्याची माहिती आल्यानंतर (Cyber Police) सायबर पोलिस ठाण्यात तक्रार मिळाल्यानंतर पुण्यात फसवणूक झालेल्या व्यक्तींनी वर्धा गाठले.
फसवणूक झालेल्या व्यक्तींनी वर्धा गाठून पोलिसांना याबाबत माहिती दिली. पुण्यातदेखील अशा पद्धतीने फसवणूक झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर यात अनेकांची मोठी फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्ध्यात आल्यानंतर संबंधितांना समाजसेवक किशोर खैरकार यांनी सहकार्य केले.
पुण्यातील पीडितांनीही सांगितली वर्धा पोलिसांना कैफियत
■■ वर्धा पोलिसांनी पुण्यात फसवणूक झाल्याचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांची व्यथा जाणून घेतली. त्यांच्या प्रकरणाच्या अनुषंगाने माहिती घेत त्यांचे समाधान केल्याने पुण्याहून आलेल्या पीडितांनी वर्धा पोलिसांचे आभार मानले.
■■ फसवणूक करणाऱ्याचे नाव राहुल देव असे सांगण्यात येते. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती आणि महिला असल्याचेही सांगण्यात येते. आरोपीची (Wardha Online fraud) हायप्रोफाईल लाईफस्टाईल असून किरायाने महागडा बंगला, महागड्या चारचाकी वाहने असल्याची माहिती कळते.
■■ आरोपी या कामात निष्णात पारंगत असल्याचे त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या संकल्पनांवरून दिसून असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या बोलण्यातून, अकाउंटवर ऑनलाइन रक्कम स्वीकारणे, तसेच दुकान, फॅक्टरीचे व्हेरिफीकेशन करायला लावणे आदी बाबींमुळे त्याच्यावर विश्वास व्हायचा. पुण्यात अशी अनेक प्रकरणे पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
■■ वर्ध्याच्या सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात पुण्याहून दोन आरोपींना अटक केली. त्यांची चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपीविरोधात पुण्याच्या दोन पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. याबाबत संबंधित पोलिस ठाण्याला माहिती दिली आहे, असे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
- तुमचे अट्रॅक्टीव्ह फर्निचर करून देतो, त्यामध्ये डिस्काउंट देतो, अशा प्रकारचे प्रलोभन देऊन लोकांना फसवण्यात येते. (Wardha Online fraud) लोकांकडून पैसे घेऊन काही दिवसांनी पसार होतात. अशा प्रकारची ऑफर काही लोक देत असतील तर त्याला बळी पडू नका. घरातील फर्निचरचं काम करत असल्यास विश्वासातील व्यक्तीकडून स्वतः उभं राहून करून घ्यावं, असा आवाहन पुण्यातील नागरिकांनी केले.
■■ घराचे इंटेरिअर डिझायनिंग (Interior designing) करायचे असलेल्या व्यक्तींनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील मल्टीसर्व्हसेस, इन्टेरिअल इन्फ्रा आणि लिवाईन डेव्हलपर्स अशा वेगवेगळ्या नावांनी असेल्या पेजेसवर संपर्क साधला. यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या पेजवर संपर्क साधला. सुरूवातीला त्याने गृहभेट देण्याकरिता पाच हजार रुपये शुल्क घेतले. तेथे त्याने घरातील डिझायनिंगविषयी चर्चा करत विश्वास संपादन केला. पॅकेज ठरवून घेतले. दुकान तसेच शोरुम पाहून खातरजमा करायला सांगितले. संबंधितांनी शोरुम तसेच फॅक्टरीची पाहणी करत खातरजमा केली. सगळ्या बाबी तपासून त्याला पैसे ऑनलाईन पद्धतीने दिले. कुणी पाच लाख, कुणी सात, तर कुणी त्यांच्या ठरलेल्या पॅकेजनुसार रक्कम दिली. त्यात एकमुस्त रक्कम दिल्यास आणखी सवलत मिळेल, असेही सांगितले.
वापरासाठीच्या साहित्याची तपासणी केली असता ते खरेखुरे क्वॉलिटीचे असल्याचे आढळले. विश्वास झाल्यानंतर त्याला पैसे दिले. पण, ताक फुंकून पित असतानाही सुशिक्षितांची फसगत झाली. दुकान, फॅक्टरी बंद केली आणि त्याने त्या भागातून पोबारा केला. वारंवार संपर्क करूनही त्याने काम करून देण्यास चालढकल चालविली. (Wardha Online fraud) फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी पुण्यातील विमाननगर, वानोडी येथे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. असाच प्रकार (Cyber Police) वारजे पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागातील काही जणांसोबत घडल्याचे कळते.