जनसेना संघटनेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
वर्धा ( Wardha ) :- जिल्ह्यात कुठेही जनजागृती न करता गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून ( Mahavitran ) नवीन प्रिपेड विद्युत मीटर ( Prepaid electricity meter ) लावण्याची बळजबरी करण्यात येत आहे. तेव्हा हा प्रकार तत्काळ थांबवून प्रिपेड मीटर योजनेबाबत नागरिकांना विविध बाबीप पटवून द्याव्यात, तोपर्यंत स्थगीती द्यावी, अशी मागणी जनसेना या संघटनेव्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून नागरिकांमध्ये कोणतीही जनजागृती न करता जिल्ह्यात नवीन पूर्व देयक ऊर्जा मीटर लावण्यात येत आहे. प्रारंभी हे मीटर त्याच परिसरात लावण्यात आले, जिथे सर्वसामान्य नागरिक राहतात, ते होत असलेल्या चुकीच्या बाबींना विरोध करीत नाही. तसेच काही ठिकाणी जबरदस्तीने हे नवीन प्रिपेड मीटर लावण्यात येत आहे. त्यामुळे या निवेदनातून जनसेना संघटनेने ( Jan Sena Organization ) काही सवाल उपस्थित ठे असून त्याचे उत्तर लेखी स्वरुपात मागितले आहेत. त्यामध्ये सदर मीटर प्रत्येकाला लावणे अनिवार्य आहे का? असल्यास यावर कुठले अधिक प्रभार शुल्क भरावे लागणार का.? समाजात मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असून प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. प्रत्येक व्यक्ती स्मार्ट फोनचा ( Person smart phone ) वापर करीत नाही. मग वीज वापरा अगोदर बिल कसे भरणार.? तर त्यावर प्रत्येक वर्गानुसार काही सूट देण्यात आली का.? नवीन प्रिपेड मीटर लावण्याआधी महावितरणतर्फे जाहीरात देण्यात आली का.? याबाबत पूर्वसूचना जनतेला देण्यात आली का? आजही आपला देश ७० टक्के शेतीवर अवलंबून आहे. परंतु दुदैव म्हणजे, तो अगोदर बिल भरु शकत नाही. मग यावर काही पर्याय आहे का? सर्वसामान्यांना कुठलीच माहिती न देता बळजबरीने मीटर लावणाऱ्या अधिकाऱ्यांना मीटरबाबत संपूर्ण माहिती आहे का? मीटर लावल्यानंतर येणाऱ्या बिलाचे प्रति युनिट शुल्क किती असणार आणि त्यात स्मार्ट मीटर ( Smart meter ) बसविल्यास मासिक मेंटनन्स शुल्क आकारणे बंदहोणारका? बिल प्रिपेड झाल्यास वीज कपात होणार नाही याची हमी देणार का? मग वीज कपात झाल्यास जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. तेव्हा या सर्व बाबीचे परीक्षण व त्रुटीचे आकलन करून संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात जबाबदार अधिकाऱ्याकडून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना
विज ग्राहकांच्या येथे प्रिपेड विद्युत मीटर ( Prepaid electricity meter ) लावण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवानीताई सुरकार, राहुल मिश्रा, पलाश उमाटे, विक्की सवाई, धीरज चौहान, आकाश हातागळे, प्रथम कुरील यांच्यासह नजनसेना संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते