३१ मार्च रोजी विजेचे दर वाढताच उद्योग क्षेत्राला फटका
वर्धा (Wardha) :- शासनाच्या वतीने उद्योगांना (to industries on behalf of Govt) सवलत देण्यात येते. अद्याप वीज सवलतीचे नूतनीकरण करण्यात आले नाही. नूतनीकरण नसल्याने उद्योग क्षेत्रातील वीज महागली असून विजेचे दर वाढताच साहित्यही महागले. त्यामुळे उद्योग क्षेत्रावर (industry sector) संकटाचे आभाळ दाटले आहे. येथील उत्पादीत साहित्याचे दर (Cost of manufactured materials ) जास्त होत असून शेजारच्या राज्यातील साहित्य कमी दरात उपलब्ध होत असल्याने येथील उद्योगांवर संक्रांत येण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
राज्य शासनाकडून २० वर्षांपासून उद्योगांना वीज सबसीडी देण्यात येत होती. ३१ मार्च रोजी विजेचे दर वाढताच उद्योग क्षेत्राला फटका मध्यप्रदेश, छत्तीसगड, हैद्राबाद आदी शेजारच्या क्षेत्रात राज्य शासनाकडून उद्योगांकरिता विजेवर सबसिडी देण्यात येते. त्यामुळे त्या राज्यांतून मिळणारा उत्पादीत मालाचे दर कमी आहे. पण, विदर्भात सबसिडीचे नूतनीकरण न झाल्याने त्याचा परिणाम दरावर होत असल्याचे सांगण्यात येते. उत्पादनाकरिता खर्च वाढत असल्याने त्याचा भावावरही परिणाम होत आहे. शेजारच्या राज्यातून येणारी उत्पादनाचे दर कमी राहत असल्याने येथील उत्पादने कशी विकली जाणार, असा प्रश्न उद्योजकांपुढे निर्माण झालेला आहे.
थेट परिणाम उद्योगांवर होण्याचे संकेत आहेत.
दीड ते दोन रुपयांपर्यंत ही वाढ झाल्याचे सांगण्यात येते. त्याचा थेट परिणाम उद्योगांवर होण्याचे संकेत आहेत. विदर्भातील उद्योगांना (Industries in Vidarbha) मिळणारी वीज दीड ते दोन रुपयांनी महागल्याने त्याचा परिणाम उत्पादीत मालाच्या किमतीवर होणार आहे. वीज महागल्याने उद्योगांतील साहित्य महाग होणार आहे. हे. त्यामुळे बाजारात या साहित्याच्या विक्रीवरही परिणाम
■■ वर्धा येथील एमआयडीसी (MIDC at Wardha) जवळपास ३०० उद्योग आहेत. छोट्यामोठ्या उद्योगांना वीज सवलत मिळत असल्याने सुरळीत काम सुरू होते. पण, वीज सवलतीला ब्रेक लागताच त्याचा परिणाम उद्योगांवर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा स्थितीत उद्योग कसे चालणार, असा प्रश्न विचारल्या जात आहे.
■■ राज्य सरकारचे उद्योगाबाबतचे धोरण (State Government’s Policy on Industry)उदासीन आहे. वीज सवलत नसल्याने येथील उत्पादने महाग होणार आहे. त्याचा परिणाम उद्योगांवर होणार आहे, असे उद्योजक संघटनेचे प्रवीण हिवरे म्हणाले. होण्याची शक्यता आहे. वीज सवलतीचे नूतनीकरण न केल्यामुळे साडेआठ ते दहा रुपयांपर्यंत प्रति युनिट वीज घ्यावी लागणार आहे. तसेच वेगवेगळ्या उद्योगानुसार वेगवेगळी वाढ पाहायला मिळत असल्याचे सांगण्यात येते. या प्रकाराने उद्योगक्षेत्राचे मात्र कंबरडे मोडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याची मुदत संपली. त्यानंतर नूतनीकरण करत मुदतवाढ करण्यात आली नाही. परिणामी, अधिभारात वाढ होऊन १३ ते १५ टक्क्यांनी उद्योगाचे विजेचे दर वाढले