उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
वर्धा (Wardha solar power plant) : निम्न वर्धा प्रकल्पावर उभारण्यात येणार्या ५०५ मेगावॅट क्षमतेच्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी, महाराष्ट्र सरकारच्या ‘महानिर्मिती’ आणि भारत सरकारच्या ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’च्या वरिष्ठ अधिकार्यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या. यावेळी ‘महानिर्मिती’ आणि ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’, तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्वापूर्ण ठरणार्या या (solar power plant) प्रकल्पामुळे जवळपास १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
‘महानिर्मिती’ आणि ‘एसजेवीएनलि’ यांचा संयुक्तिक प्रकल्प
निम्न (लोअर) वर्धा प्रकल्प हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी जवळील वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर असून, यावर प्रस्तावित असलेल्या तरंगता (solar power plant) सौरऊर्जा प्रकल्पाकरिता महानिर्मितीने पूर्ण व्यवहार्यता सर्वेक्षण केलेले असून त्यानुसार जवळपास ७३२ हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार आहे. विकासकामांसाठी जवळपास ३०३० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून वार्षिक हरित ऊर्जा निर्मिती जवळपास १०५१.२८ दशलक्ष युनिट्स अपेक्षित असून ३६ महिन्यांमध्ये या प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
राज्य सरकारने मान्य केलेल्या तरंगता (solar power plant) सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळेल आणि नूतनीकरण योग्य बंध पूर्ण करण्यास तर सौरऊर्जा प्रकल्प स्थापित क्षमतेचे आणि निर्मितीचे समतुल्य उत्सर्जन टाळून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहाय्यभूत ठरेल. या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी टाळता येईल तर प्रस्तावित ५०५ मेगावॅटची स्थापित क्षमतेला लक्षात घेत, वार्षिक सीओ२ उत्सर्जन जवळपास ८,६२,०४९ टन कमी होईल तर वार्षिक कोळशाचाही वापर जवळपास ८,४९,४३४ टनाने कमी करण्याकरिता मदत मिळणार आहे. ४९/५१ अश्या समभागाने या प्रकल्पाकरिता ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’ आणि ‘महानिर्मिती’ यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे.
उद्योग व रोजगानिर्मितीकडे पहिली झेप
आर्वी तालुक्यातील धानोडी येथील लोअर वर्धा प्रकल्पावर ५०५ मेगा वॅट क्षमतेच्या (solar power plant) सौर ऊर्जा प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. भारत सरकारची कंपनी सतलज जलविद्युत निगम व महाराष्ट्र सरकारची कंपनी महानिर्मिती संयुक्तपणे ३०३० कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार आहे. स्थानिक क्षेत्राचा विकास करण्यास सक्षम असलेल्या या प्रकल्पातून १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया सुमीत वानखेडे यांनी व्यक्त केली.