■ अनेक ग्रामीण भागात नळयोजना पोहोचली नाही
■ विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव
वर्धा (Wardha) : ग्रामीण भागात आजही अनेक गावांत नळयोजना (Plumbing) पोहोचली नसल्याने नागरिक विहिरीच्या व कुपनलिकेच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. उन्हाळ्याचे (Summer ) दिवस असल्याने पाण्याचा वाढलेला वापर लक्षात घेता बहुतांश विहिरी कोरड्या पडल्याने व कुपनलिकेला पाणी नसल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळते. शासनाकडून (Govt) प्रत्येक घरी पाणी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त होत असला तरी जिल्ह्यात ग्रामीण भागातील अनेक डोंगराळ व माळराण (Hilly and plain) भागात पाण्याची योजना पोहोचली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाई तेथील नागरिकांच्या पाचवीला पुजली असल्याचे सांगण्यात येते. ही गंभीर परिस्थिती जिल्ह्याच्या एका टोकावर असलेल्या आष्टी तालुक्यातील अनेक गावांत पहायला मिळते. दुसरीकडे सेलू तालुक्याच्या काही गावातही पाणीटंचाईचे चित्र असल्याचे सांगण्यात येते, उन्हाळा मध्यान्हावर येऊन ठेपला असताना काही गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
भविष्यात पाणीटंचाई व होणारी भटकंती थांबवायची असेलतर पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल
आणखी एक ते दिड महिना उन्हाळा आहे. असे असताना त्या गावातील नागरिकांना पाण्यासाठी किती धडपड (struggle for water)करावी लागेल, हे येणारा काळच सांगणार आहे. वर्षानुवर्षे पाण्याची पाणी पातळीत घट होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय असल्याचे जलतज्ञ सांगतात. म्हणून प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे ते वारंवार आवाहन करीत आहे. परंतु या आवाहनाला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने वर्षानुवर्षे पाणीटंचाईची स्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे विहिरी व कुपनलिका कोरडया पडून पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. तेव्हा भविष्यात पाणीटंचाई व होणारी भटकंती थांबवायची असेलतर पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल, हे तेवढेच खरे आहे. वर्षानुवर्षे पाण्याची पाणी पातळीत घट होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय असल्याचे जलतज्ञ सांगतात. म्हणून प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे ते वारंवार आवाहन करीत आहे. परंतु या आवाहनाला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने वर्षानुवर्षे पाणीटंचाईची स्थिती गंभीर होत आहे.
प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा
पूर्वी विहिरीतील पाणी दोर व बकेटीने पाणी काढले जात होते. कुपनलिकेतून पाहिजे तेवढे पाणी हपसले
जात होते. त्यामुळे पाण्याचा वापर कमी प्रमाणात होत होता. परंतु अलिकडच्या काळात विहिरीवर सरळ
मोटारी लावून पाणी घेतले जात आहे. यासाठी कोणतीही अंगमेहनत करावी लागत नसल्याने पाण्याचा वापर
मोठ्या प्रमाणात होत आहे. सरळ मोटारीने पाइपद्वारे घेतले जाणारे पाणी मनात येईल तेवडे शिंपळले जाते